PS-1 Movie Promotion News PS-1 Movie Promotion News
मनोरंजन

PS-1 : ऐश्वर्या रायने कपिल शर्माच्या शोमध्ये जाणे टाळले; सलमान खान आहे कारण?

अनेकांनी ऐश्वर्याची अनुपस्थिती सलमानसोबत जोडली

सकाळ डिजिटल टीम

PS-1 Movie Promotion News पोन्नियिन सेल्वन हा चित्रपट शुक्रवारी (ता. ३०) प्रदर्शित होणार आहे. मल्टीस्टारर चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात प्रमोशन केले जात आहे. पोन्नियिन सेल्वनची स्टारकास्ट देखील भारतीय टीव्हीच्या सर्वांत लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली. शोमध्ये खूप धमाल-मस्ती केली. परंतु, ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) आली नाही. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

द कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये पोन्नियिन सेल्वनचे स्टार्स पाहुणे म्हणून दिसणार आहेत. विक्रम आणि त्रिशा हेही दिसतील. परंतु, बॉलिवूड ब्युटी ऐश्वर्या राय बच्चन शोमध्ये न दिसल्याने चाहते थोडे नाराज झाले आहेत. प्रोमोमध्ये किंवा व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ऐश्वर्याची उपस्थिती दिसली नाही.

शोमध्ये ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai) दिसली असती तर मजा द्विगुणित झाली असती. परंतु, शोमध्ये ऐश्वर्या राय आली नाही. द कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्या राय दिसत नसल्याचे यामागे सलमान खान कनेक्शन सांगण्यास नेटकऱ्यांनी उशीर केला नाही. कपिल शर्मा शोचा निर्माता सलमान खान असल्यामुळे ऐश्वर्याने कॉमेडी शोमध्ये येणे टाळल्याचे नेटकरी म्हणाले.

अनेकांनी ऐश्वर्याची अनुपस्थिती सलमानसोबत जोडली. काही चाहते ऐश्वर्या रायचा बचाव करताना दिसले. अभिनेत्रीने शोमध्ये ए दिल है मुश्किल या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. याला उत्तर देताना दुसऱ्याने लिहिले, ऐश्वर्या शोमध्ये आली होती. तेव्हा सलमान शोचा निर्माता नव्हता. एकाने लिहिले ऐश्वर्या राय इतरत्र प्रमोशनमध्ये व्यस्त असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT