Ponniyin Selvan Box Office Collection  Esakal
मनोरंजन

Ponniyin Selvan 2 Box Office: ऐश्वर्याचा 'पोन्नियिन सेल्वन 2' प्रेक्षकांना भलताच आवडला! पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला...

Vaishali Patil

सर्वात लोकप्रिय आणि बहूप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'Ponniyin Selvan 2' शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मणिरत्नम दिग्दर्शित 'पोनीयिन सेल्वन 2' ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. यासोबतच पहिल्या भागाप्रमाणेच 'PS 2' ने देखील भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आणि भरपूर कमाई केली.

28 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल झालेला ' पोन्नियिन सेल्वन 2' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दहशत निर्माण केली आहे. हा चित्रपटाने चांगले वातावरण देखील निर्माण केले आहे आणि समीक्षक आणि प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहे.

याआधी 'पोनियिन सेल्वन 1' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता . तसेच, आता 'पोनियिन सेल्वन 2' आल्यानंतर, PS2 बॉक्स ऑफिसवर काय आश्चर्य दाखवत आहे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेतच.

Ponniyin Selvan 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं तर, सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी एकूण 32 कोटींची कमाई केली आहे. SecNilk च्या मते, Ponniyin Selvan 2 ने शुक्रवारी 59.94% तमिळ, 10.20% हिंदी आणि 33.23% सह 32 कोटी रुपये कमावले.

चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांच्यानुसार, "TN BO मधील #PonniyinSelvan2 साठी शुभ सुरुवातीचा दिवस ठरला. #Varisu ला मागे टाकत चित्रपटाने वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम ओपनिंग मिळवली. #Thunivu अजूनही 2023 साठी प्रथम स्थानावर आहे." थलपथी विजयच्या वारिसूने भारतभर रिलीजच्या पहिल्या दिवशी २६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'पोन्नियिन सेल्वन 2' हा बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे.

चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल सांगायचं तर, यात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, जयचित्रा, नस्सर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.

हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 मध्ये आलेल्या पोन्नियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT