Ajay Devgan & Kajol Google
मनोरंजन

लग्नाच्या 23 वर्षानंतर अजय म्हणतोय,'काजोलला प्रपोजच केलं नव्हतं,मी तर...'

अजय देवगणनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान काजोलसोबत लग्न का केलं याबाबत मोठा खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

अभिनेता अजय देवगण(Ajay Devgan) आणि काजोल(Kajol) यांच्यात एक भन्नाट केमिस्ट्री आहे. आणि ते दोघेही यामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. अनेक मुलाखतींमधून नेहमीच त्या दोघांनीही आपल्यात असलेल्या प्रेमाची जाहिर कबूली दिली आहे. याच वर्षी फेब्रुवारीत त्यांच्या लग्नाला तब्बल २३ वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या अजय देवगण त्याच्या Runway 34 या त्याच्या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं बिझी आहे. तेव्हा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं काजोलशी आपण लग्न का केलं याविषयी खुलासा केला आहे,अर्थात त्यानंतर चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

मुलाखतीत अजय देवगणला विचारलं गेलं होतं की,'काजोलशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला?' याचं उत्तर मात्र त्यानं खूप खास अंदाजात दिलं आहे. तो म्हणाला,''आमच्यात तेव्हा खूप छान बॉन्डिंग झालं होतं. एकमेकांना प्रपोज केल्याशिवाय आमच्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या. आम्ही एकमेकांना प्रपोज केल्याशिवाय आम्ही लग्नाचा निर्णय घेतला,कारण आमचे विचार खूप एकसारखे होते. आम्हाला एकमेकांसोबत कामं देखील मिळत गेली आणि मग त्यामुळेही आम्ही भावनिकदृष्ट्या जवळ आलो''.

तो पुढे म्हणाला,''प्रत्येक लग्नात उतार-चढाव येत असतात,पण त्यावेळी तुम्हाला सगळे प्रसंग योग्य पद्दतीनं हाताळता आले पाहिजेत. कारण दोन माणसांचं डोकं एकाच पद्धतीनं विचार करू शकत नाही. पण अनेकदा मी आणि काजोल चर्चा करून अनेक गोष्टी हाताळतो. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं चुकलं आहे,तेव्हा फक्त ते तुम्हाला मान्य करता आलं पाहिजे आणि त्यावेळी माफी मागून विषय संपवता यायला हवा''.

अजय देवगण पुढे म्हणाला की,'' मी काजोलची खूप काळजी करतो आणि प्रत्येकवेळेला मी वेगवेगळ्या पद्धतीनं ते तिला दाखवून देतो''. अजयचा Runway 34 लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या तो त्याच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं कथानक दोहाहून कोचिनला येणाऱ्या विमानात घडलेल्या सत्य घटनेपासून प्रेरित आहे. या सिनेमात अजय देवगण,रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या व्यतिरिक्त सिनेमात अमिताभ बच्चन,बोमन ईराणी,कैरी मिनाती असे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा २९ एप्रिल,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Smshanbhoomi Viral Video : ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत कन्नड संभाषण,'भूत बाटलीत बंद केलंय'; फोटो आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Pune Weather : पुण्यात पावसाचा जोर ओसरणार, हवामान विभागाची वर्तवणी

India vs Australia T20: मेलबर्नमध्ये भारताचे वर्चस्व अपेक्षित; आज दुसरा टी-२० सामना, सूर्यकुमारची बॅट तळपणार?

म्हणून मी नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही... लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण

Fake Call Center: अमेरिकेतून मिळणार फसवणुकीबाबतचा अहवाल; फेक कॉल सेंटर प्रकरण, पोलिसांनी घेतली मेलद्वारे माहिती

SCROLL FOR NEXT