Bhola Movie  Google
मनोरंजन

Bhola सिनेमातला 'तो' सीन व्हायरल.. ज्याच्यासाठी अजय देवगणनं चक्क 3 महिने केलेलं प्लॅनिंग..

अजय देवगणनं 'भोला' सिनेमातील अंगाचा थरकाप उडवणारा एक ६ मिनिटाचा सीन शेअर केला आहे.

प्रणाली मोरे

Bhola Movie : 'दृश्यम २' नंतर अजय देवगण पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दणक्यात एन्ट्री करतोय ते त्याच्या आगामी 'भोला' सिनेमातून. अजय देवगणनं 'भोला' सिनेमातील अंगाचा थरकाप उडवणारा एक ६ मिनिटाचा सीन शेअर केला आहे.

या व्हिडीओत अजय देवगण आपल्या अॅक्शन सीनवर टीमसोबत चर्चा करताना दिसतो. अजयनं जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात तो खतरनाक अॅक्शन सीन्स करताना दिसत आहेत, असे सीन याआधी कधीच त्याच्या इतर सिनेमात दिसले नाहीत. हा सिनेमा थ्री डी मध्ये रिलीज होत आहे. (Ajay Devgn Bhola Movie share glimpse bike truck chase sequence)

अजय देवगणनं आपल्या सिनेमातील बाइक राइड आणि ट्रकचा एक ६ मिनिटाचा सीन शेअर केला आहे , जो शूट करण्यासाठी ११ दिवस लागले. बोललं जात आहे की या सीनचं प्लॅनिंग करायला तब्बल ३ महिने लागले होते.

अजय देवगणनं जो व्हिडीओ शेअर केला आहे ज्याच्या सुरुवातीला काही शब्द स्क्रीनवर लिहिलेले दिसतात. या व्हिडीओवर लिहिलं आहे की,''या सिनेमाचे अॅक्शन सीन्स माझे वडील वीरू देवगण यांना मी समर्पित करतो आहे,एक अशी व्यक्ती ज्यांनी मला सगळं काही शिकवलं''.

त्यानं पुढं लिहिलं आहे की,'' ६ मिनिटाचा बाइक-ट्रक राइड चेसच्या त्या सीनचं शूटिंग ११ दिवस चाललं ते सोबत रिस्क घेऊन. याच्या प्लॅनिंग आणि रिहर्सलला ३ महिने लागले''.

व्हिडीओमध्ये अजय देवगण स्वतः त्या सीनवर काम करताना दिसत आहे. सुरुवातीला तो ट्रक आणि बाइकच्या खेळण्यांना घेऊन सगळं डिसाईड करताना दिसत आहे की कसं या सीनला चित्रित करायचं आणि त्यानंतर या आधारावर हा सीन कसा शूट करायचा ते ठरवलं गेलं.

भोला सिनेमा ३० मार्चला रिलीज होणार आहे आणि या सिनेमात त्याच्यासोबत तब्बू देखील आहे. अजय देवगण दिग्दर्शित 'भोला' २०१९ साली रिलीज झालेला 'कैथी' या तामिळ सिनेमाचा ऑफिशियल हिंदी रीमेक आहे. या ओरिजनल 'कैथी' सिनेमाला कनगराजनं दिग्दर्शित केलं आहे. आणि या सिनेमात कार्थि हा अभिनेता लीडमध्ये होता.

'भोला' अशा व्यक्तीची कहाणी आहे जो १० वर्ष जेलमध्ये सजा भोगल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो आणि मग त्याच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा राहतो.

या सिनेमात अजय देवगण व्यतिरिक्त मकरंद देशपांडे,दीपक डोबरियाल आणि गजराज राव व्यतिरिक्त तब्बू देखील मुख्य व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT