Ajay Devgn Drishyam 2 Review. AKshay Khanna New entry Google
मनोरंजन

Drishyam 2 Review: इंटरवललाही खुर्चीवरनं हलले नाहीत लोक, क्लायमॅक्सनं तर उडवली झोप...

मल्याळम भाषेतील ओरिजनल 'दृश्यम 2' पाहूनही हिंदी रीमेक पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता दिसून येतेय.

प्रणाली मोरे

Drishyam 2 Review: 'दृश्यम 2' चं शूटिंग यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात सुरु झालं होतं आणि सिनेमा 18 नोव्हेंबर,2022 रोजी रिलीज देखील झाला. 'दृश्यम'च्या मल्याळम भाषेतील दोन्ही ओरिजनल भागांनी चांगली कमाई करत यश मिळवलं. हिंदीतही 'दृश्यम'चा पहिला भाग हिट ठरला आणि 'दृश्यम 2' देखील आता तिच जादू करणार असं दिसत आहे.

'दृश्यम 2' चा स्टार कलाकार तर या सिनेमाची कथा...असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. मूळ मल्याळम सिनेमा सुरू होतो संथ गतीनं, पण त्याचा रीमेक करताना अभिषेक पाठकने तो तसा होऊ नये याची काळजी घेतलेली दिसत आहे. इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की ओरिजनल मल्याळम 'दृश्यम 2' पाहणाऱ्यांमध्येही याचा हिंदी रीमेक पाहण्याची उत्सुकता दिसून येत आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स हलवून सोडतो आणि पहिल्यापासून कुणाला याविषयी माहित असेल तरी देखील दुसऱ्यांदा पाहणंही तितकंच उत्साही ठरतं.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

दृश्यम 2 ची कथा तिथून सुरु होते जिथे एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याचं समोर तर येतं पण त्याचा मृतदेह मात्र मिळत नाही. वडीलांना आपल्या मुलाच्या आत्म्याच्या शांतीसाठी अंतिमसंस्कार करायचे असतात. पण त्या मृतदेहाला विजयनं एका अशा ठिकाणी पुरलेलं असतं जिथे कोणी पोहचूच शकत नाही. आईला तर आपल्या मुलाच्या हत्येचा बदला फक्त विजय साळगावकरकडून नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडून घ्यायचा असतो.

आताच्या कथेत मीराहून तरबेज पोलिस अधिकारी जो तिचा मित्र आहे तो आयपीएस अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसलेला दिसतो. या कथेतही विजय साळगावकरनं लढवलेली प्रत्येक शक्कल कोणत्या ना कोणत्या सिनेमाशी साधर्म्य साधणारी असते आणि पूर्ण पोलिस डिपार्टमेंट यामुळे हैराण होताना दिसतं.

सिनेमा सुरुवातीला थोडा धीम्या गतीनं सुरु होतो आणि आपल्याला वाटू लागतं की उगाच वेळ काढून सिनेमा पहायला आलो. पण अर्ध्या तासानंतर सिनेमात जेव्हा पहिला ट्वीस्ट येतो तेव्हा आपण हैराण होऊन जाल १०० टक्के. आणि त्यानंतर तर खुर्चीवरनं सिनेमा आपल्याला उठू देत नाही. एकामागून एक घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना चक्रावून सोडतात. क्लायमॅक्स तर इतका जबरदस्त आहे की एक क्षण अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

अजय देवगणच्या अभिनयानं सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. विजय साळगावकरच्या भूमिकेत पुन्हा एकदा अजय जबरदस्त दिसतोय. असं वाटत नाही की ७ वर्षानंतर अजय विजय साळगावकरची भूमिका साकारतोय, असं वाटतं की पहिल्या भागानंतर लगेचच त्यानं दुसऱ्या भागाची शूटिंग केली आहे.

अक्षय खन्नाची सिनेमात नवी एन्ट्री आहे आणि तो आपल्या भूमिकेत परफेक्ट शोभून दिसतोय. तोच सिनेमात नवा ट्विस्ट घेऊन येतो. तब्बू आणि रजत कपूरचं काम उत्तम झालंय. अर्थात दोघेही मुरलेले कलाकार त्यामुळे हे वेगळं सांगायची गरज नाही. अजयच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारलेली श्रिया सिरन या भागातही आपलं काम चोख करुन गेलीय. अजयच्या मुलांच्या भूमिकेत इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांनी देखील आपलं काम छान केलं आहे.

तेव्हा विजय साळगावकरच्या चक्रावून अन् भंडावून सोडणाऱ्या फिल्मी शक्कल पहायला हा सिनेमा थिएटरात जाऊन पाहणंच उत्तम ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT