मनोरंजन

'गंगूबाई'मध्ये अजय देवगण दिसणार गँगस्टर करीमलालाच्या भूमिकेत

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट बनवीत आहेत. हा चित्रपट कामाठीपुरातील माफिया क्वीन गंगूबाईच्या जीवनावर बेतलेला आहे. या गंगूबाईने शरीरविक्री करणाऱ्या महिलांसाठी आणि अनाथ बालकांसाठी खूप मोठे कार्य केले आहे. वेश्याव्यवसायात जबरदस्तीने आणलेल्या कित्येक मुलींना तिने त्यातून सोडविले आहे.

कामाठीपुरात येणाऱ्या काही गँगस्टर्सची तिची ओळख झाली आणि या ओळखीतूनच ती गँगस्टर करीमलाला याच्यापर्यंत पोहोचली. करीमलाला याला ती आपला भाऊ मानायची. त्यामुळे कामाठीपुरा आणि आजूबाजूच्या परिसरात तिचा खूप दबदबा होता. कामाठीपुरात एखादी घटना घडली की न्याय मागायला कुणीही गंगूबाईंकडे यायचा आणि ती प्रत्येकाला आपल्या परीने मदत करायची. आता तिच्याच जीवनावरील गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट आहे आणि  या चित्रपटात आलिया भट मुख्य भूमिका अर्थात गंगूबाईंची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण बाकी आहे. गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत भव्य सेट लावण्यात आलेला आहे.

मध्यंतरी हा सेट तोडण्यात येणार असे बोलले जात होते. मात्र आता तो तोडण्यात येणार नाही. पावसाळ्यात त्याची देखभाल करण्यासाठी प्राॅडक्शन हाऊसतर्फे आठ-दहा माणसे तेथे ठेवण्यात आली आहेत. आता लवकरच चित्रीकरण सरकारची परवानगी घेऊन सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता या चित्रपटात  दोन कलाकार सामील होणार आहेत. अजय देवगण आणि इमरान हाश्मी. यातील अजय देवगण गँगस्टर करीमलालाची भूमिका साकारणार आहे. इमरान नेमकी कोणती भूमिका करणार हे स्पष्ट झालेले नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT