Akanksha Dubey Suicide Update
Akanksha Dubey Suicide Update Esakal
मनोरंजन

Akanksha Dubey Suicide: 'माझ्यासोबत काहीही घडलं तर जबाबदार..',आकांक्षाच्या नव्या 38 सेकंदाच्या व्हिडीओनं सत्य आलं समोर

प्रणाली मोरे

Akanksha Dubey Suicide: वाराणसी हॉटेलमध्ये आत्महत्या करणारी भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा आणखी एक खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आकांक्षा रडत-रडत आपली हत्या होणार असल्याची शंका व्यक्त करतेय. सोबत असंही बोलतेयच की जर माझ्यासोबत काही झालं तर समर सिंग त्याला जबाबदार असेल.

व्हीडीओमध्ये आकांक्षा खूपच हताश झाल्यासारखी दिसत आहे. या जगात आपल्याला रहायचं नाही असं देखील म्हणताना दिसतेय. व्हिडीओ सोबत एक फोटो देखील समोर आला आहे. ज्यामध्ये आकांक्षाच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याच्या खूणा दिसत आहेत.

खूणा पाहिल्यावर तर स्पष्ट होतंय की तिला कुणीतरी मारलं आहे. पोलिसांनी याआधीच समर सिंगला ताब्यात घेतलं आहे. त्याच्या विरोधात आकांक्षाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोललं जात आहे की हा व्हिडीओ आता आकांक्षाच्या मृत्यूचा गुंता सोडवण्यास मदत करेल.(Akanksha Dubey Suicide Update bhojpuri actress New Video Viral)

आकांक्षाचा मृतदेह २६ मार्च रोजी सारनाथच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला होता. त्या दिवशी आकांक्षाचे वाराणसीमध्ये शूटिंग होते. मृत्यूच्या एक दिवस आधी आकांक्षा एका पार्टीतून हॉटेलवर परतल्याचा व्हिडीओ देखील याआधी समोर आला आहे.

सकाळी जेव्हा तिला शूटिंगसाठी फोन करण्यात आला तेव्हा तिनं फोन उचलला नाही. त्यानंतर हॉटेलच्या स्टाफनं पोलिंसाच्या उपस्थितीत मास्टर की नं आकांक्षाच्या रुमचा दरवाजा उघडला. तेव्हा आकांक्षा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. अर्थात त्यावेळी कोणतीच सुसाइड नोट पोलिसांना घटनास्थळी सापडली नाही.

आकांक्षाच्या आईनं आपल्या मुलीच्या निधनासाठी भोजपुरी गायक समर सिंग आणि त्याचा नातेवाईक संजय सिंग यांना जबाबदार ठरवलं आहे आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. अनेक दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी समर सिंगला गाझियाबाद इथून तर संजय सिंगला वाराणसीमधून ताब्यात घेतलं. समर सिंगला पोलिस कोठडी देखील सुनावण्यात आली होती.

बुधवारी १९ एप्रिल,२०२३ रोजी आकांक्षाच्या आईला इन्स्टाग्राम स्टेटसमधनं एक व्हिडीओ मिळाला. ३८ सेकंदाच्या या व्हिडीओत आकांक्षा खूप रडताना दिसत आहे. ती रडताना सांगत आहे की,''मला कळत नाही मी कुठे चुकले. मला आता या जगात रहायचं नाही. माझी तुम्हा सगळ्यांना शेवटची विनंती आहे की माझ्यासोबत जे काही होईल त्याच्यासाठी समर सिंगला जबाबदार धरा''.

आकांक्षाच्या आईनं व्हिडीओ वकीलांना दिला आहे. बोललं जात आहे की हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समर सिंगला या केसमधून सुटणं अशक्य होईल. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईनं समर सिंगवर तिला मारझोड करण्याचा, फसवण्याचा आरोप करत केस दाखल केली होती.

आकांक्षाच्या आईच्या तक्रारीनंतर समर सिंग आणि त्याचा नातेवाईक संजय सिंगला अटक करण्यात आली आहे. समरला पोलिस कोठडी मिळाली होती. त्यावेळी चौकशीत त्यानं आपण गुन्हेगार नाही असं म्हटलं होतं. नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर वाराणसीचे वरिष्ठ पोलिस कमिश्नर संतोष सिंग यांनी समर सिंगच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. तपास सुरू आहे आणि नवा व्हिडीओ केसला योग्य वळण देईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT