Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan Sudhir Gadgil Resignation esakal
मनोरंजन

Marathi Natya Sammelan : नाट्यसंमेलन स्वागताध्यक्षपदाचा सुधीर गाडगीळ यांचा राजीनामा; मराठा आंदोलनाचा परिणाम?

मराठी रंगभूमीदिनी राज्यव्यापी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आंदोलनाची धग राज्यभर असल्याने संमेलनाचा प्रारंभ करणे उचित नसल्याची भूमिका संयोजकांनी मांडली.

सांगली : गेल्या तीन वर्षांपासून होणार, होणार म्हणून गाजत असलेले अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ रविवारी (ता. ५) सांगलीत रोवण्यात येणार होती. यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते.

तथापि, राज्यभर उसळलेल्या मराठा आंदोलनामुळे हे सर्व कार्यक्रम तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आहे. विष्णुदास भावे नाट्यविद्यामंदिरच्या प्रांगणात आज सकाळी संमेलनाचा मंडप उभारणीचा मुहूर्त होता. तथापि, एकूण वातावरण पाहता हा सोहळा पुढे ढकण्यात आला. मराठी रंगभूमीदिनी राज्यव्यापी १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर होणार आहे.

वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे. नाट्यपंढरीत तशी घोषणा व तयारीही सुरू होती. विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान समारंभ प्रतिवर्षी ५ नोव्हेंबरला होत असतो. आता या सर्व कार्यक्रमांबाबत साशंकता आहे. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर सुरू झाला. आंदोलनाची धग राज्यभर असल्याने संमेलनाचा प्रारंभ करणे उचित नसल्याची भूमिका संयोजकांनी मांडली. त्यानंतर अंतिम निर्णय झाला.

दरम्यान, आमदार सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे समाजमाध्यमांवरून जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागतध्यपद भूषवणे योग्य वाटत नाही. मराठा बांधवासमवेतच आहे.’’

अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे म्हणाले, ‘‘राज्यभर आंदोलनाची दाहकता विचारात घेता रंगभूमीदिनाचे कार्यक्रम करावेत, याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय करू. दोन दिवसांत याबाबतची माहिती जाहीर केली जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT