Akshay Kumar: 
मनोरंजन

Akshay Kumar: "अरे मी जाहिरात शुट केली कारण....", पान मसाला जाहिरातीच्या वादावर अखेर अक्षय कुमारनं सोडल मौन!

Vaishali Patil

Akshay Kumar Pan Masala Ad: सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला खुप ट्रोल करण्यात येत आहे. त्याचे कारण आहे ते त्याने केलेली पान मसाल्याची जाहिरात.

अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अजय देवगण हे एका पान मसाल्याच्या नवीन जाहिरातीसाठी पुन्हा चमकले आहेत. मात्र ही काही पहिले वेळ नाही यापुर्वी देखील हे कलाकार या जाहिरातीत दिसले होते.

मात्र त्यावेळी अक्षय कुमारने त्याच्याकडून चुक झाली आणि तो पुन्हा या जाहिरातीचा भाग राहणार नाही असं सांगितले होते. पण पुन्हा तो या जाहिरातीत चमल्याने ट्रोलिंगचा विषय ठरला.

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळे अखेर अक्षय कुमारने या विषयावर मौन सोडलं आहे.

एक पोस्ट शेअर करताना अक्षयने पान मसाल्याच्या जाहिरातीबाबत असं काही वक्तव्य केलं की आता त्याचे वक्तव्य लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

अक्षय कुमारने नुकतेच सोशल मीडियावर ट्विट करत आपले स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय या ट्विटमध्ये लिहितो की, "जर तुम्हाला इतर गोष्टींव्यतिरिक्त फेक न्यूजमध्ये पसरवण्यात रस असेल तर तुमच्यासाठी ही काही फॅक्टचेक आहेत.

ही जाहिरात 13 ऑक्टोबर 2021 रोजी शूट करण्यात आली होती. तेव्हापासून मी जाहिरातीचे शूटिंग बंद करण्याची घोषणा केली होती.

तेव्हापासून माझा या ब्रँडशी काहीही संबंध नाही. या पूर्वी शूट केलेल्या जाहिराती ते पुढील महिन्याच्या शेवटापर्यंत कायदेशीररित्या चालवू शकतात. शांत व्हा आणि काही खऱ्या बातम्या करा."

थोडक्यात अक्षयने ही जाहिरात यापुर्वीच शुट केली होती. कंपनीने केलेल्या करारानुसार तो संपेपर्यंत कंपनी त्याची जाहिरात चालवू शकते. मात्र अक्षयचा ब्रँडशी काहीही संबध नाही असं त्याने सांगितलं.

शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या पान मसालाची जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या जाहिरातीची शाहरुख आणि अजय देवगण आणि अक्षय कुमार हे तीन कलाकार दिसतात तर बिग बॉस फेम सौंदर्या शर्मा देखील या जाहिरातीचा भाग आहे. आता ही जाहिरात जुनी असल्याचे अक्षयने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT