Akshay Kumar esakal
मनोरंजन

Akshay Kumar : 'काळजी करु नको तू फक्त...' आईचे ते शब्द आठवले, अक्षय रडला!

बाकी कुणी काही का म्हणेना पण बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा स्वॅग पूर्णपणे वेगळा आहे. तो अभिनेता आणि एक माणूस म्हणून किती ग्रेट आहे हे त्यानं वेळोवेळी दाखवून दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Kumar Bollywood actor selfiee movie : बाकी कुणी काही का म्हणेना पण बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा स्वॅग पूर्णपणे वेगळा आहे. तो अभिनेता आणि एक माणूस म्हणून किती ग्रेट आहे हे त्यानं वेळोवेळी दाखवून दिले आहे. कोरोनाच्या काळात त्याच्या सामाजिक जाणीवेची सगळ्यांनी दखल घेतली होती.

बॉलीवूडमध्ये आपल्या हटक्या भूमिकांनी अक्षयनं नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेलं वर्ष हे अक्षय कुमारसाठी काही लाभदायी ठरलं नाही. त्याचे चार ते पाच चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामध्ये बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन, कटपुतली हे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळे अक्षयची डोकेदुखी आणखी वाढली होती. मात्र निराश होईल तो खिलाडी कसला, आता त्याचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Also Read - जाणून घ्या काॅन्ट्रा फंडातल्या गुंतवणुकीबाबत

अक्षयचा सध्या सेल्फी नावाचा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या प्रमोशनमध्ये अक्षय सध्या व्यस्त आहे. अशातच एका मुलाखतीमध्ये अक्षयनं आपल्या आजवरच्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. ते सांगताना तो कमालीचा भावूक झाला होता. त्यानं आईनं आपल्याला कशाप्रकारे प्रेरित केलं होतं हे सांगून चाहत्यांना धक्का दिला होता.

बाळा काही झालं तरी चालेल पण तू नाराज अजिबात व्हायचं नाही, खचून जायचं नाही. आपण जिंकणार आहोत हे लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार वाटचाल करायची. देव नेहमीच तुझ्या पाठीशी आहे. असे शब्द माझ्या आईचे असायचे. त्यामुळे मी कितीही प्रतिकुल परिस्थिती असली तरी आईची प्रेरणा पाठीशी असते. हे सांगताना अक्षय भावूक झाला होता.

नव्या वर्षात अक्षयचा पहिला चित्रपट सेल्फी हा प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांकडून खूप अपेक्षा आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट मोठी कामगिरी करेल याची शक्यता कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT