Akshay Kumar Completed Movie in 30 days, Boney Kapoor Slammed actors who wants to work for only 30 days.
Akshay Kumar Completed Movie in 30 days, Boney Kapoor Slammed actors who wants to work for only 30 days. Google
मनोरंजन

Boney Kapoor: ' सिनेमाचे पूर्ण पैसे घेऊन फक्त.... ', अक्षय कुमारच्या विरोधात बोनी कपूरचा सूर

प्रणाली मोरे

Boney Kapoor: बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या कलाकारांची सध्या जोरदार तुलना होताना दिसत आहे. हिंदी सिनेमांनी साऊथच्या सिनेमांसमोर गुडघे टेकल्याच्या बातम्या सध्या जोर धरुन आहेत. आता निर्माता बोनी कपूर यांनी बॉलीवूडच्या कलाकारांवर यावरनं निशाणा साधला आहे.(Akshay Kumar Completed Movie in 30 days, Boney Kapoor Slammed actors who wants to work for only 30 days.)

हेही वाचा: बातम्या, टिप्सचा गुंतवणुकीवर नका होऊ देऊ परिणाम

त्यांनी म्हटलं आहे की,''बॉलीवूडच्या कलाकारांना एखादा सिनेमा त्यांनी सांगितलेल्या ठराविक वेळेतच पूर्ण करायचा असतो. सिनेमे फ्लॉप होण्यासाठी हे एक महत्त्वाचं कारण आहे. बोनी कपूर म्हणाले, ''ते आजही पहिल्या नियमांना फॉलो करतच सिनेमे बनवत आहेत. साऊथचे सिनेमे या कारणानं चालतात कारण तिथले मेकर्स पॅशननं काम करतात,झोकून देतात स्वतःला त्या कलाकृतीमध्ये,जे बॉलीवूडमध्ये ९० सालापर्यंत निर्माते करताना दिसायचे''.

बोनी कपूर आपली मुलगी जान्हवी कपूरसोबत 'मिली' सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शो मध्ये पोहोचले होते. बोनी कपूर यांनी सांगितलं की बॉलीवूडच्या अभिनेत्यांना २५ ते ३० दिवसांत सिनेमा शूट करायचा असतो आणि फी त्यांना पूर्ण हवी असते. बोनी कपूर म्हणाले, ''साऊथच्या निर्मात्यांना पॅन इंडियावर सिनेमे रिलीज करायचे असतात तर बॉलीवूडच्या निर्मात्यांना जगभरात सिनेमा पोहोचवायचा असतो. पण आधी स्वतःच्या देशातील काना-कोपऱ्यात तर न्या तुमचा सिनेमा''.

बोनी कपूर पुढे म्हणाले,''आजकाल काही हिरो असे आहेत आपल्याकडे ज्यांना २५ ते ३० दिवसांत सिनेमाचे पूर्ण पैसे हवे असतात. मी त्यांची नावं सांगणार नाही. ते अॅक्टर्स कामाचे दिवस मोजतात अन् मग सगळं ठरवतात. त्यांचे सगळे पहिल्यापासून रेडी असते. भले सिनेमाची अभिनेत्री,दिग्दर्शक ठरलेले असोत किंवा नाही. ईमानदारी कोणाच्याच विचारात दिसत नाही मला आजकाल. जोपर्यंत विचारात ईमानदारी नसेल मग तो निर्माता,दिग्दर्शक,अॅक्टर कोणीही असो... तोपर्यंत सिनेमा चालणारच नाही''.

आता बोललं जात आहे की बोनी कपूर यांचा इशारा अक्षय कुमारच्या दिशेने होता. कारण अक्षय कुमारनं अनेकदा हे बोलून दाखवलं आहे की तो एका सिनेमाचं शूटिंग एका महिन्यात म्हणजे ३०-३१ दिवसांत पूर्ण करतो. आणि अशा पद्धतीनं तो ४ ते ५ सिनेमे वर्षाला करतो. 'सम्राट पृथ्वीराज'चं शूटिंग अक्षयने ४० दिवसांत पूर्ण केलं होतं. नंतर जेव्हा सिनेमा चालला नाही तेव्हा मात्र त्याला खूप ट्रोल केलं गेलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT