Akshay-Salman Dance Esakal
मनोरंजन

Akshay-Salman Dance: बॉलीवूडच्या खिलाडीनं भाईजानला नाचवलं! पण नेटकऱ्यांनी घेतला क्लास..

"आता भाईजान अक्कीचंही करिअरचा वाचवेल ", असे टोमणे नेटकऱ्यांनी अक्षयला मारले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड स्टार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीसोबत सेल्फी या चित्रपटात दिसणार आहे. या गाण्यातील 'मैं खिलाडी' हे गाणं व्हायरल होत आहे. अक्षय या गाण्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने अनेक सेलिब्रिटिंसोबत या गाण्यावर डान्स केला. आता अक्षयने या गाण्यावर सलमान खानलाही नाचवलं आहे.

अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांनंतर त्यानेही शाहरुख खानच्या पठाणप्रमाणे सेल्फीमध्ये भाईजानची मदत घेतली आहे. त्यानेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खानचा आधार घेतला. असं नेटकरी म्हणतं आहेत.

अक्षय कुमारने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो सलमान खानसोबत डान्स करत आहे. सेल्फी चित्रपटातील मैं खिलाडी या गाण्यावर दोन्ही सुपरस्टार्सनी डान्स केला. अक्षय सलमानला गाण्याच्या सुरांवर नाचायला लावतो आणि म्हणतो की तो चटकन शिकणारा आहे.

त्याचा डान्स व्हिडिओ प्रेक्षकांसाठी एखाद्या व्हिज्युअल 'ट्रीट'पेक्षा कमी नव्हता. यात सलमानने जीन्ससोबत काळ्या रंगाचा फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला होता. तर, अक्षयने निळ्या टी-शर्टसह तपकिरी पँट कॅरी केली आहे. दोघेही खूप मस्ती करतांना दिसत आहेत. या कॅज्युअल लूकमध्ये दोघांनी बागेत डान्स केला.

सलमान आणि अक्षयच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खुप आवडला आहे. खुप वर्षांनतर या दोघांची जोडी चाहत्यांच्या भेटीला आली आहे. त्याचबरोबर काहींनी अक्षयला टोमणाही मारला आहे. पठाणमध्ये शाहरुख खाननंतर अक्षयलाही सलमानच्या कंपनीची गरज कशी पडली असा प्रश्न चाहते अक्षयला विचारत आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिले की, "पठाणनंतर खिलाडीलाही सलमान खानच्या सपोर्टची गरज पडली." दुसऱ्याने लिहिले की, "बॉलिवुड कलाकारांना आता फक्त सलमान खानच वाचवू शकतो." ‘आता भाईजान अक्कीचंही करिअरचा वाचवेल’, अशीही एक प्रतिक्रिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले

SCROLL FOR NEXT