मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटातून आणि या कठीण परिस्थितीतून साऱ्यांनी लवकरात लवकर सावरलं पाहिजे यासाठी हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूडमध्ये अतिशय संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जाणारा तसंच समाजकार्यात नेहमीच पुढे असणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या परीने मदत करत आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीला तसेच गरजूंना मदत केल्यानंतर आता तो मुंबई पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. त्याने मुंबई पोलिसांना हाताला बांधले जाणारे सेन्सर बॅण्ड दान केले आहेत. जवळपास एक हजार सेन्सर बॅण्डची त्याने मुंबई पोलिसांना मदत केली आहे.
या सेन्सर बॅण्डची खासियत म्हणजे या बॅण्डमुळे पोलिसांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आहेत की नाही याची माहिती मिळणार आहे. हे सेन्सर बॅण्ड पोलिसांच्या मनगटामध्ये असतील. सध्याच्या या कठीण परिस्थितीत कोरोना विषाणूची लढाई मुंबई पोलीस फ्रंटलाईनवर येऊन लढत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांसाठी अक्षयने हे नवं पाऊल उचललं आहे.
हा सेन्सर बॅण्ड नुकताच लाँच करण्यात आला आहे. या बॅण्डचा वापर सर्वात आधी मुंबई पोलिस करणार आहेत. हा सेन्सर बॅण्ड जो कोणी वापरेल त्याच्या शरीराचे तापमान, हार्ट रेट, रक्तदाब, झोप, चालण्याचा काउन्ट आणि कॅलरीचे परीक्षक ही सगळी माहिती या सेन्सर बॅण्डद्वारे मिळणार आहे. यामुळे एखाद्याला कोरोना विषाणूनची लागण झाली की नाही हे समजण्यास मदत होणार आहे. हे सेन्सर बॅण्ड GOQii vital 3.0 कंपनीने तयार केले आहे.
मुंबई पोलिसांना मदत करण्यासोबत या कठीण परिस्थितीत अक्षयने पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये २५ कोटीं रुपयांची मदत केली होती. बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये अक्षयनेच सर्वात मोठ्या रक्कमेची मदत केली आहे. याशिवाय तो थिएटर मालिक आणि आर्टिस्टच्या मदतीसाठी देखील पुढे आला होता. अक्षयसह बरेच बॉलिवूडमधील कलाकार, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. कलाविश्वातील हा मदतीचा ओघ अजूनही सुरु आहे.
akshay kumar donates 1000 wrist bands to mumbai police
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.