akshay kumar  Team esakal
मनोरंजन

काश्मिरमधील शाळेसाठी बॉलीवूडच्या खिलाडीचं 1 कोटींचं दान

बॉलीवूडचा खिलाडी (bollywood khiladi) म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमारनं (akshay kumar) यापूर्वी देखील आपल्या सामाजिक दातृत्वाचा परिचय करुन दिला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा खिलाडी (bollywood khiladi) म्हणून मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या अक्षय कुमारनं (akshay kumar) यापूर्वी देखील आपल्या सामाजिक दातृत्वाचा परिचय करुन दिला आहे. त्यानं कोरोनाच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला होता. त्यानं गेल्या वर्षी महापुराचा फटका बसलेल्यांना मदत केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवत लोकांना सहकार्य करण्याची अक्षयची वृत्ती त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. शेतकऱ्यांसाठी देखील तो अनेकदा धावून आला आहे. आता अक्षय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याची सहकार्यशीलता आहे. (akshay kumar donates rupees one crore for rebuilding school in kashmir yst88)

काश्मीरमध्ये एका शाळेसाठी त्यानं आपलं दातृत्व दाखवून दिलं आहे. त्याचं झालं असं की, गेल्या महिन्यात अक्षय काश्मिरमधील बीएसएफच्या जवानांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं तिथली एक शाळा पाहिली. आणि तेव्हा त्यानं त्या शाळेसाठी काही करायचं असा निर्णय घेतला. तो लागलीच अंमलातही आणला. त्यानं त्या शाळेसाठी चक्क एक कोटी रुपयांचे दान देण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यानं या कामाची कुठेही जाहिरात केलेली नाही. त्यानं स्वताहून त्या कामाची पोस्टही सोशल मीडियावर शेयर केली नाही.

akshay

त्यानं सोशल मीडियावर केवळ फोटो शेयर केले आहे. ज्यात तो भारतीय जवानांशी बातचीत करताना दिसतो आहे. त्यानं ज्या शाळेसाठी एक कोटी रुपये दिले. त्या शाळेचा कोनशिला कार्यक्रम नुकताच पार पडला. त्याची माहिती बीएसएफनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन दिली आहे. अक्षयनं ज्या शाळेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे ती शाळा काश्मीरमधील नीरू गावात आहे. त्या शाळेचे नाव अक्षयचे वडिल स्वर्गीय हरिओम भाटिया यांच्या नावानं ठेवण्यात आले आहे. शाळेचे पूर्ण नाव हरिओम भाटिया एज्युकेशन ब्लॉक गव्हर्नमेंट मिडल स्कुल नीरु असे आहे.

सध्या अक्षयच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याचा बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा सुर्यवंशम नावाचा चित्रपट अजूनही प्रदर्शित झालेला नाही. चाहत्यांना त्याच्या या दोन्ही चित्रपटांची कमालीची उत्सुकता आहे. कोरोनाचा फटका त्याच्या या दोन्ही चित्रपटांना बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा! विलियम्सन दुखपतीमुळे नाही, तर 'या' कारणामुळे खेळणार नाही

Call of Duty creator accident Video : ‘कॉल ऑफ ड्यूटी’ प्रसिद्ध व्हिडिओ गेम निर्माते विन्स झॅम्पेला यांचे भयानक अपघातात निधन!

INDW vs SLW, 2nd T20I: ११ चौकार, १ षटकार अन् नाबाद अर्धशतक... शफाली वर्माची बॅट तळपली! भारताचा सलग दुसरा विजय

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

SCROLL FOR NEXT