Selfiee Twitter Review Esakal
मनोरंजन

Selfiee Twitter Review: 'पैसा बरबाद..असा सिनेमा काढण्यापेक्षा तर', अक्षय अन् इम्रानच्या 'सेल्फी'ची ट्विटरवर लागली वाट..

सकाळ डिजिटल टीम

Selfiee Twitter Review: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांचा 'सेल्फी' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत. या कॉमेडी-ड्रामा चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली असून.हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट 'ड्रायव्हिंग लायसन्स'चा अधिकृत रिमेक आहे.

आता या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राज मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला बहुतांश लोकांनी 'डिझास्टर' म्हटलं आहे. काही लोकांनी तर असंही म्हटलं आहे की, ओरिजनल साऊथ चित्रपट OTT वर पाहणं चांगलं. अक्षयचे चाहतेही त्याच्यावर निराश झाले आहेत. ट्विटरवर हा सिनेमा ट्रेण्ड करत आहे. 'सेल्फी'चे ट्विटर रिव्ह्यूवर एक नजर टाकूया.

एकानं ट्विट केलयं की, सर असा चित्रपट नका करू, एक चाहता म्हणून दुखावलो आहे. मोठ्या अपेक्षेने चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. मात्र पुर्णपणे निराश झालो आहे. तर दुसऱ्यानं ट्विट केलंय हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठा डिझास्टर असणार आहे.

तर काहींनी या चित्रपटाला फक्त एकच स्टार रेटिंग दिलं आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट पाहिल्यानंतर मूड खराब झाला, तर काहींनी थेअटरमधील रिकाम्या खुर्चीचे फोटो टाकत सिनेमाची काय परिस्थीती आहे हे दाखवलं आहे.

असे नाही की ट्विटरवर फक्त 'सेल्फी'चे नकारात्मक रिव्ह्यू आले. काही निवडक युजर्सनीही चित्रपटाचं कौतुकही केलं. एकाने लिहिले की,... सेल्फी म्हणजे मनोरंजनाचं पूर्ण पॅकेज आहे, त्यात विनोद, भावना आणि अनेक उपकथानकांचा समावेश आहे.'  

अक्षय आणि इम्रारनच्या मागील काही चित्रपटांवर नजर टाकली तर त्याचा हा चित्रपट हिट होणं खुप आवश्यक होतं कारण त्याचे मागील चित्रपटही फारशी कमाई करु शकलेले नाही. सेल्फी ही पहिल्या दिवशी कितीचा गल्ला कमावते हे तर कळेलच . अक्षयच्या चाहत्यांची मात्र निराशा झाल्याचे या चित्रपटावरुन दिसतयं. आता त्याच्या चाहत्यांची नजर 'बडे मिया छोटे मिया' आणि 'हेराफेरी 3' कडे असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT