Akshay Kumar new ad promotes dowey promoting a punishable offence dowery, netizens and politician trolling tweet against actor's  Google
मनोरंजन

नवीन जाहिरातीमुळे अक्षय पुन्हा गोत्यात, आता हुंडा प्रथेला प्राधान्य देताना दिसला

एका सरकारी जाहिरातीत अक्षय कुमारनं रोड सेफ्टीसंदर्भात संदेश दिला आहे पण त्याची ही नवी जाहिरात अनेकांना खटकली आहे.

प्रणाली मोरे

Akshay Kumar: केंद्रिय मंत्री नितिन गडकरी(Central Minister Nitin Gadkari) यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर रोड सेफ्टीवर आधारित असलेली एक जाहिरात शेअर केली आहे. या व्हिडीओत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार दिसत आहे. ही जाहीरात मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अॅन्ड हायवे ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली आहे. पण नितिन गडकरी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या जाहीरातीवर नेटकरी मात्र नाराज दिसतायत. जाहीरातीवर टीकेची झोड उठली आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? चला,जाणून घेऊया. (Akshay Kumar new ad promotes dowey promoting a punishable offence dowery, netizens and politician trolling tweet against actor's)

माहितीसाठी इथं नमूद करतो की,सरकाराने लोकांमध्ये गाडीतील ६ एअरबॅग्ज संदर्भात जागरुकता आणण्यासाठी अक्षय कुमारला सोबत घेऊन एक जाहीरात केली आहे. नितिन गडकरी यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवर ही जाहिरात शेअर करताना लिहिलं आहे-'' ६ एअरबॅग्ज वाल्या गाडीतला प्रवास सुरक्षित ठरणार आहे''. हा संदेश देणाऱ्या जाहिरातीत अक्षय कुमारनं ट्रॅफिक पोलिसाची भूमिका केली आहे. या जाहिरातीत एका मुलीची लग्नानंतर सासरी पाठवणी करताना दाखवलं गेलं आहे. ज्यामध्ये वडीलांकडून गिफ्ट केल्या गेलेल्या गाडीत मुलगी बसून रडत आहे. तेव्हा अक्षय कुमार येतो आणि मुलीच्या वडीलांना सांगतो की या गाडीत ६ एअरबॅग्ज नाहीत. असं असताना मुलगी रडेलच. यानंतर वडील तिला ६ एअरबॅग्ज असलेली गाडी गिफ्ट करतात आणि मुलगी हसायला लागते. जाहिरातीच्या मध्येच ग्राफिक्सच्या मदतीनं ६ एअरबॅग्जचं अपघाताच्यावेळी होणारं सहाय्य किती मोलाचं आहे हे समजावून सांगण्यात आलं आहे.

आता बातमी आहे की एअरबॅग्जविषयी जागरुकता आणण्याच्या नादात हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य दिलं आहे. सोशल मीडियावर कितीतरी दिग्गजांनी आणि नेटकऱ्यांनी या जाहिराती विरोधात टीकेचा सूर काढला आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यावरही हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य दिल्याचे आरोप लावले जात आहेत. या जाहिरातीत लग्न होऊन सासरी जाणारी मुलगी माहेरहून २ एअरबॅग्ज असलेली गाडी घेऊन जाते तेव्हा अक्षय कुमार तिच्या वडीलांना ६ एअरबॅग्ज वाली गाडी मुलीला गिफ्ट करण्यासाठी जोर लावताना दिसतो. आणि हेच अनेकांना खटकले आहे. एकप्रकारे अक्षय यातून हुंड्याच्या प्रथेला प्राधान्य देतोय असं अनेकांचे म्हणणे आहे.

इतर पक्षातील काही राजकारणी म्हणताना दिसत आहेत की, 'अशी जाहीरात कोण बनवतं?' या जाहिरातीला समस्या वाढवणारी जाहिरात संबोधत शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी यावर हैराण होत लिहिलं आहे की,''अशा पद्धतीच्या जाहिरातींना कोण संमती देतं? यामुळे अपराध वाढतील'. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता साकेत गोखलेंनी देखील या जाहिरातीवर ताशेरे ओढले आहेत.

तर नेटकरी म्हणतायत,'ही जाहिरात भरकटली आहे. एक असं लग्न यात दाखवलं आहे ज्यात नववधूला सासरी जाताना ६ एअरबॅग्ज असलेली गाडी माहेरहून घेऊन जायचं आहे. हे काय दाखवलंय? सरकारी जाहिरात अशी कशी बनवली गेली. खूप चूकीची कल्पना आहे. रोड सेफ्टी संदर्भात बोलताना वेगळ्या पद्धतीनं देखील बोलू शकले असते'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'केवळ भारत सरकारच आमच्या सारख्या लोकांच्या टॅक्समधून हुंड्याला प्राधान्य देणाऱ्या जाहिरातीवर पैसे खर्च करू शकतात''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT