Akshay Kumar On his Flopped FIlms, says, 'I am Indian, but i feel sad for...' Google
मनोरंजन

'मी एक भारतीय, पण मला दुःख आहे की...' अक्षय कुमारनं केलं मोठं विधान

सध्या अक्षय कुमार त्याच्या रक्षाबंधन सिनेमामुळे चर्चेत आहे. पण सिनेमाला अपेक्षेप्रमाणे बॉक्सऑफिसवर यश मिळताना दिसत नाही.

प्रणाली मोरे

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारला(Akshay Kumar) नेहमी कॅनडा कुमार म्हणत ट्रोल केलं जातं. अक्षयने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की,भारतात तो कर भार उचलत असला तरी अद्याप तो कॅनडाचाच नागरिक आहे. २०१९ मध्ये कॅनडाच्या नागरिकत्वासाठी आणि लोकसभा निवडणुका दरम्यान मतदान न केल्यासंदर्भात त्याला खूप सुनावण्यात आलं होतं. अभिनेत्याने म्हटलं आहे की सिनेमे चालत नव्हते तेव्हा त्यानं कॅनडाला परत जाण्याचा विचार केला होता. एक वेळ अशी आली होती की तो आयुष्यात हताश झाला होता.(Akshay Kumar On his Flopped FIlms, says, 'I am Indian, but i feel sad for...')

आता हे काही पहिल्यांदाच घडत नाही की अक्षयनं आपल्या नागरिकत्वाचा खुलासा केला आहे. कॉफी विथ करण ७ मध्ये करण जोहरने अक्षयला विचारलं होतं की,'त्याला ट्रोल केलं जातं का ?' तेव्हा अक्षयने लगेच उत्तर दिले होत की ,'तो जास्त ऑनलाइन नसतो'. तो म्हणाला होता, 'मी जास्तीत जास्त कॅनडाविषयी लिहितो. आणि असं केल्याने काय होईल याची मी चिंता करत नाही'. जेव्हा करण म्हणाला, 'लोक तुला कॅनडा कुमार म्हणतात'. तेव्हा अक्षयने उत्तर दिले,'हो,कॅनडा कुमार म्हणतात. ठीक आहे,बोलू दे'. नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, 'तो एक भारतीय आहे,जो कायम होता'.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, ''काही वर्षापूर्वी माझे सिनेमे चालत नव्हते. जवळपास १४-१५ सिनेमे फ्लॉप गेले. तेव्हा मी विचार केला होता, मला कुठेतरी जाऊन दुसरं काम करायला हवं होतं. त्यानं खुलासा केला की, माझा एक मित्र कॅनडात राहत होता. आणि त्यानेच मला शिफ्ट होण्याचा सल्ला दिला. खूप लोक कामासाठी कॅनडात जातात. पण ते अजूनही भारतीय आहेत. तेव्हा मी पण विचार केला होता की भारतात मला भाग्य साथ देत नाही तर मी पण कॅनडात जाऊन काम करावं. मी तिथे गेलो, नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि मला नागरिकत्व मिळालं''.

''पण मग भारतात मला सिनेमात यश मिळू लागलं आणि माझा विचार बदलला''. तो म्हणाला, ''माझा पासपोर्ट आहे. तो फक्त एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कामी येतो. पण मी एक भारतीय आहे,मी भारतात वेळेत माझा कर भरतो. मी कॅनडातही कर भरू शकतो पण मी भारतात कर भरतो. मी भारतात काम करतो. त्यामुळे मी माझ्या देशाचं देणं लागतो. जे लोक माझ्या कॅनडाच्या नागरिकत्वावरनं बोलतात त्यांना मी एवढंच सांगेन,मी भारतीय आहे आणि कायम भारतीय राहणार''.

पण अक्षय कुमारचा कॅनडियन नागरिकत्वाचा मुद्दा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. पहिल्यांदा अक्षय म्हणाला होता की,त्यानं भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. २०१९ साली एका मुलाखतीत तो म्हणाला होता,'' मी एक भारतीय आहे,पण मला याचं दुःख आहे की प्रत्येक वेळेस मला भारतात स्वतःला सिद्ध करावं लागलं''. आता अक्षय त्याच्या रक्षाबंधन सिनेमामुळे चर्चेत आहे. पण अपेक्षेप्रमाणे सिनेमाला बॉक्सऑफिस वर यश मिळताना दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Congress Political Drama : निवडणुकीच्या आधी आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय घडामोडी!, दिग्गज नेत्याने काही तासांत राजीनामा घेतला मागे...

ओला-उबर प्रवाशांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे चार नवे निर्देश; धोरणात मोठे बदल

Yoga For Stress: सततच्या ताणामुळे कॉर्टिसोल वाढतंय? 'ही' सोपी योगासने टेन्शनही करतील दूर अन् हृदयही ठेवतील निरोगी

Latest Marathi News Update : भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

Severe Night Sweats: रात्री घामाने भिजता? ‘नाइट स्वेट’ची लक्षणे ओळखा, वेळेत घ्या उपचार!

SCROLL FOR NEXT