Akshay Kumar Son aarav Bhatia Photo viral with mystery girl, who is she? read inside Google
मनोरंजन

Akshay Kumar च्या मुलासोबत दिसली मिस्ट्री गर्ल...कोण आहे नाओमिका सरन?

सध्या स्टार किड्सच्या डेटिंगच्या चर्चा इंडस्ट्रीत जोर धरुन असताना अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाच्या व्हायरल फोटोनं चर्चेला उधाण आलं आहे,

प्रणाली मोरे

Akshay Kumar Son Aarav Bhatia: अक्षय कुमार बॉलीवूडच्या सुपरस्टार्सपैकी एक. त्याच्यावरच नाही तर त्याच्या कुटुंबावर देखील लोक तिततकाच जीव ओवाळून टाकतात. अक्षयला दोन मुलं आहेत..मोठा मुलगा आरव तर धाकटी नितारा भाटिया.

अक्षयची दोन्ही मुलं लाइमलाइटपासून नेहमी दूर असतात. पण असं असलं तरी कुठे ना कुठे या दोघांना चाहते हेरून काढतातच. आता आरवचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,

ज्यात एक मिस्ट्री गर्ल सोबत तो दिसत आहे. आजकाल अनेक स्टार किड्स यामुळे चर्चेत आहेत. चला पाहूया आता अक्षयच्या मुलासोबत होती ती मिस्ट्री गर्ल कोण होती?(Akshay Kumar Son aarav Bhatia Photo viral with mystery girl, who is she? read inside)

20वर्षाच्या आरव भाटियाचा फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. फोटोमध्ये त्याच्यासोबत एक क्यूट मुलगी दिसत आहे. त्यामुळे आता अक्षयच्या चाहत्यांना त्याच्या मुलासोबत दिसलेल्या त्या मिस्ट्री गर्ल विषयी जाणून घेण्याची इच्छा आहे. तर आरव सोबत असलेली ही मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून त्याच्या मावशीची मुलगी आहे. ट्विंकल खन्नाची लहान बहिण रिंकी खन्ना हिची १८ वर्षीय कन्या नाओमिका सरन हिचा फोटो सध्या आरवसोबत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

शनिवारी नाओमिकाने आरव सोबतचा एक सेल्फी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत दोघांनी मस्त क्युट स्माइल दिलेलं दिसत आहे. निळ्या रंगाच्या शर्टमध्ये आरवही छान दिसतोय. त्याच्या गळ्यात एक स्टायलिश नेकलेसही दिसतोय. तर नाओमिकानं व्हाइट ड्रेस आणि लॉकेट परिधान केलेलं दिसत आहे. या बहिण भावाचे दोन फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांची प्रशंसा मिळवताना दिसत आहेत.

Akshay Kumar Son aarav Bhatia Photo viral with mystery girl, who is she? read inside

सोशल मीडियावर नोओमिकाचे चांगले फॅनफॉलोइंग आहे. एका नेटकऱ्यानं दोघांचे हे फोटो पाहून लिहिलं आहे, 'आता दोघांनीही अॅक्टिंगमध्ये करिअर सुरु करायला हवं'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, 'दोघांचे डोळे किती सुंदर आहेत'. अनेकांनी या बहिण-भावाच्या जोडीला फेव्हरेट जोडी संबोधत त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केलेला दिसत आहे.

नाओमिका रिंकी खन्ना आणि समीर सरन यांची मुलगी आहे. रिंकी खन्ना ही सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची छोटी मुलगी आहे. तिनं १९९९ मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली. 'मुझे कुछ कहना है', 'जिस देश में गंगा रहता है', 'ये है जलवा','चमेली',' झंकार बीट्स' अशा सिनेमातून रिंकी खन्नानं काम केलं आहे. पण काही काळानंतर तिनं आपली मोठी बहिण ट्विंकल खन्नासारखंच अभिनय क्षेत्राला रामराम केला. सध्या ती लंडनमध्ये राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT