मनोरंजन

Akshay Kumar: "सुधा मूर्तींचे जावई यांना...", अक्षय अन् ट्विंकलने घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट! व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Akshay Kumar, Twinkle meet UK PM Rishi Sunak in London: बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. अक्षय सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अक्षयची पत्नी आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली आहे. यावेळी ट्विंकलने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी गप्पा देखील मारल्या. हा व्हिडिओ शेअर करताना ट्विंकलने सुधा मूर्ती यांना हिरो असं म्हटलं आहे.

या व्हिडिओत ट्विंकल लिहिते की, “मला हिल्स घालायला आणि सजायला आवडत नाही, आजची संध्याकाळ खराब झालेल्या पायाची होती. सुधा मूर्ती या माझ्या हिरो राहिल्या आहेत. पण त्यांचा जावई पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटून खूप आनंद झाला."

ट्विंकल खन्नाने लेखिका, इन्फोसिस फाउंडेशनचे अध्यक्षा, इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचे केलेले कौतुक सर्वांना खुप आवडले आहेत. सध्या ट्विंकलने शेयर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी यावर कमेंट करत आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले - अक्षय कुमार आणि ऋषी सुनक भाऊ असल्यासारखे दिसत आहेत. तर एकानं लिहिलयं की, नमस्ते लंडन.

अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा पुढचा चित्रपट 'मिशन राणीगंज' हा 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. अक्षयलाही या चित्रपटापासून खुप अपेक्षा आहेत.

तसाच तो टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाही अक्षय दिसणार आहे. यासोबतच त्याच्या वेलकम टू जंगल या चित्रपटाचाही टिझर नुकताच रिलिज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT