Akshay Kumar, Selfie movie, imran hashmi SAKAL
मनोरंजन

बॉडीगार्डने फॅनला जोरात धक्का मारल्यावर Akshay Kumar च्या कृतीने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडिओ व्हायरल

एका फॅनने बॅरिकेड वरून उडी मारून अक्षयच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला

Devendra Jadhav

Akshay Kumar Viral Video: सुपरस्टार अक्षय कुमारचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. सध्या अक्षय त्याच्या सेल्फी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. अक्षय ठिकठिकाणी सिनेमाचं प्रमोशन करत आहे.

अशातच एका धक्कादायक घटनेची प्रचंड चर्चा सुरु आहे. सेल्फी सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान हि घटना घडली. सेल्फीच्या प्रमोशनवेळी एके ठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्याच गर्दीत हि घटना घडली.

(Akshay Kumar's action won everyone's hearts after the bodyguard punched the fan video viral)

अक्षय कुमार सेल्फी सिनेमाचं प्रमोशन करत होता तेव्हा आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक बघण्यासाठी फॅन्सनी गर्दी केली. अक्षय कुमारच्या सुरक्षेसाठी अनेक बॉडीगार्ड आणि बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

पण एका फॅनने बॅरिकेड वरून उडी मारून अक्षयच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षयच्या बॉडीगार्डनी त्या फॅनला जबरदस्तीने खाली ढकलले. त्यानंतर ती फॅन बाजूला जोरात फेकली गेली.

हे सर्व मागे उभ्या असलेल्या अक्षय कुमारला दिसलं. त्याने बॉडीगार्डला शांत राहायला सांगितलं. आणि त्याने स्वतः पुढे येऊन त्या फॅनला हात देऊन वर उठवलं. आणि त्या फॅनला अक्षयने मिठी मारली. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

अक्षय कुमारच्या कृतीचं सगळीकडे खूप कौतुक झालं. अक्षय कुमारला फॅन्सची काळजी आहे असं नेटकरी म्हणाले आणि त्यांनी अक्षयच्या वागण्याचं कौतुक केलं.

सुपरस्टार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी त्यांच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. दरम्यान 22 जानेवारीला निर्मात्यांनी 'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला.

या चित्रपटात अक्षय कुमार विजय नावाच्या अभिनेत्याच्या भूमिकेत आहे तर इमरान पोलिस ऑफिसर आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच खीलाडी कुमार आगीतून बाहेर पडताना दिसत आहे आणि 'जंगल मेरा मुझे कहते हैं शेर' असा डायलॉग म्हणतो.

पृथ्वीराज प्रॉडक्शन, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स निर्मिती 'सेल्फी' 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात अक्की आणि इम्रान व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मोहीम

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT