Akshay Raveena video Viral khiladi got style hall fame awards 
मनोरंजन

Akshay-Raveena : काय योगायोग, रविनाच्या हातून अक्षयला पुरस्कार! ब्रेकअपनंतर दोघं पहिल्यांदाच एकत्र

रविना टंडन आणि अक्षय कुमार यांच्याविषयी नेहमीच चर्चा होत असते. मोहरा चित्रपट आला आणि रविना-अक्षयमध्ये काहीतरी आहे अशी गोष्ट चाहत्यांना समजली.

सकाळ डिजिटल टीम

Akshay Raveena video Viral khiladi got style hall fame awards : रविना टंडन आणि अक्षय कुमार यांच्याविषयी नेहमीच चर्चा होत असते. मोहरा चित्रपट आला आणि रविना-अक्षयमध्ये काहीतरी आहे अशी गोष्ट चाहत्यांना समजली. ते एकमेकांना डेटही करत होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. मात्र अक्षयला काय झाले माहिती नाही. त्यानं रविनाशी लग्न करण्यास नकार दिला. त्यावरुन रविनानं अक्षयशी बोलणं तोडलं होतं.

एका कापर्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही सेलिब्रेटी पुन्हा एकत्र आले होते. इतक्या वर्षांनी ते दोघेही एकाच मंचावर आल्यानं चाहत्यांना मोठा आनंद झाला होता. ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट असल्याचे दिसून आले. चाहत्यांनी पुन्हा एकदा त्या भुतकाळातील गोष्टींना उजाळा देत अक्षय रविनाला चिडवल्याचे दिसून येत आहे. चाहत्यांना मात्र त्यांना एकत्रित पाहून आनंद झाला आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अक्षयला स्टाईल हॉल ऑफ फेमनं गौरवण्यात आले. आणि तो पुरस्कार त्याला रविनाच्या हातून देण्यात आला. त्यावेळचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अक्षयला तो पुरस्कार मिळाला याच्यापेक्षा तो रविनाच्या हातून मिळाला याचा मोठा आनंद झाला आहे. त्यावेळी दोन्ही सेलिब्रेटींच्या चेहऱ्यावरील हास्य खूप काही सांगून जाणारे होते.

रविना आणि अक्षयच्या अफेयरची आणि त्याच्या रिलेशनची एकेकाळी खूपच चर्चा होती. त्यावरुन हे दोन्ही सेलिब्रेटी खूप लोकप्रियही झाले होते. तेव्हा अक्षय आणि रविनाचा मोहरा हा चित्रपट खूपच हिट झाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले होते. अफलातूनमध्ये देखील रविना आणि अक्षय एकत्र होते. त्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. असं म्हणतात की, अक्षय आणि रविनाचं नातं हे रविनाच्या घरच्यांना पसंत नव्हतं. त्यामुळेच की काय त्यांचे लग्न झाले नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय आणि रविनाचा साखरपुडा देखील झाला होता. अक्षयनं तिचा विश्वासघात केल्याचे रविनाचे म्हणणे होते. यापूर्वी देखील वेगवेगळ्या मुलाखतीतून रविनानं लोकांनी आम्हाला नेहमीच आमच्या नात्यावरुन ट्रोल केल्याची खंत व्यक्त केली होती. इतक्या वर्षांनी देखील आम्हाल त्या गोष्टीवरुन का ट्रोल केले जाते असा प्रश्न रविनानं विचारला होता.

ब्रेक अपनंतर इतक्या वर्षांनी रविना आणि अक्षय एकत्र आल्याचे दिसून आले. त्यानंतर तो फोटो पाहिल्यावर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. सोशल मीडियावर तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून आल्या आहेत. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, रविना आणि अक्षय कुमारचे अखेर पॅच अप झाले आहे. ५५ वर्षांच्या अक्षयनं अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. तर आता ४८ वर्षांच्या रविनानं उद्योगपती अनिल थडानीशी लग्न केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT