Akshaya Gurav Google
मनोरंजन

Marathi Actress: कोण आहे अक्षया गुरव? जिच्या एका फोटोनं इंडस्ट्रीत..

सुजय डहाकेचा श्यामची आई, समीत कक्कड यांचा रानटी , तसंच डंका असे बडे प्रोजेक्ट अक्षया गुरवनं आपल्या नावावर केले आहेत.

प्रणाली मोरे

Akshaya Gurav :अभिनेत्री अक्षया गुरवने नवीन वर्ष दणक्यात सुरु केलं आहे. नवीन वर्षीच ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन , फॅन्सना चांगली भेट दिली. तिच्या या फोटोने सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळवली आहे. 2023 ची अशी चांगली सुरुवात झाल्यानंतर अक्षया गुरव आता नवीन वर्षात नवीन चॅलेंजेस घेण्यासाठी सज्ज झाली आहे. (Akshaya Gurav Bold Photo big marathi project marathi actress)

अक्षयाला या बद्दल विचारले असता अक्षया सांगते,’’ 2022 हे वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी काही उत्तम सिनेमा शूट केले. त्यात सुजय डहाकेचा श्यामची आई, समीत कक्कड यांचा रानटी , तसंच डंका या सिनेमांचा समावेश आहे. हे सर्व सिनेमा या वर्षी प्रदर्शित होतील याची उत्सुकता आहे.’’ त्यामुळे या वर्षी अक्षयाच्या विविध भूमिका प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. त्याच प्रमाणे 2022 च्या इफ्फीमध्ये फ्रेम हा सिनेमा दाखवण्यात आला होता. फ्रेमही यावर्षी प्रदर्शित होणार आहे.

त्याच प्रमाणे अक्षयासाठी हे वर्ष महत्वाचं आहे, त्या बद्दल ती सांगते, ‘’गेल्या वर्षी राज्य पुरस्कारांमध्ये रिवणावायली या सिनेमासाठी मला नामांकन मिळाले आहे. या पुरस्कारांची प्रतिक्षाही या वर्षी आहे.’’अक्षयाला या वर्षी सिनेमा -वेबसिरीज अशा माध्यमात उत्तमोत्तम काम करायचं आहे. ‘’कामा व्यतिरीक्त स्वतःच्या फिटनेसवर लक्ष द्यायचं आहे.

जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायच्या आहेत. मला वेगवेगळ्या जागा पाहायला आवडतं, नवीन माणसांना भेटायला आवडतं. त्यामुळे खूप फिरायचं आहे. जास्तीत जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न आहे’’, असं अक्षयाचं नवीन वर्षाचं प्लॅनिंग आहे. त्यामुळे अक्षया नवीन वर्षात कोणत्या भूमिकेत दिसून येते याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT