Alia Bhatt Ranbir Kapoor Daughter Raha Kapoor  
मनोरंजन

Alia-Ranbir: आलिया भट्ट-रणबीर कपूरने घेतला 'राहा' साठी महत्वाचा निर्णय; आता करणार...

Vaishali Patil

बॉलीवूडमधील सुपर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्याच्या घरी एका परचे स्वागत केले. रणबीर आणि आलिया पालक बनल्याबद्दल चाहत्यांनाही आनंद झाला आहे आणि राहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या राहा कपूरसाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

रणबीर आणि आलियाने आई-वडील झाल्यानंतर राहाला मीडियापासून दूर ठेवले होते, परंतु अलीकडेच या जोडप्यांनी मीडिया फोटोग्राफर्स यांच्यासाठी गेट-टूगेदर ठेवलं होतं. मीडियाशी बोलल्यानंतर रणबीर कपूरने स्वत: त्याची मुलगी राहा हिचे कधीही न पाहिलेले फोटो मीडियाला दाखवले. काही बॉलीवूड न्यूजच्या सोशल मिडिया अकाउंटने याबद्दल माहिती दिली. त्यानुसार, रणबीर कपूर आणि आलियाने राहाला दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत तिचे फोटो क्लिक करू नयेत अशी विनंती केली होती.

त्याचवेळी, विरल भयानी यांनीही या जोडप्याचे कौतुक केले आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सुंदर कपल रणबीर कपूर आलिया भट्ट आणि नीतू कपूर यांनी मीडिया फोटोग्राफर्ससाठी खास गेट टुगेदर होस्ट केले. या जोडप्याने मीडियाला आपल्या मुलाचे फोटो न काढण्याची विनंती केली. रणबीरने आम्हाला त्याच्या फोनमध्ये बेबी राहाचा फोटो दाखवला.

आलिया भट्टने 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुलगी राहा हिला जन्म दिला. तेव्हापासून आलिया भट्ट आणि रणबीरने राहासाठी नो फोटो पॉलिसी स्वीकारली होती. पहिल्यांदाच आलिया-रणबीर पिक्समध्ये मुलगी राहाची एक झलक सोशल मीडियावर दिसली जेव्हा तिचे नाव जाहीर झाले. आलियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुलीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ज्ञानेश्वरी मुंडेंच्या भेटीनंतर सुळेंचा कुमावतांना फोन; परळीतील महादेव मुंडे खून प्रकरण

Dombivli Politics: 'मोदी भेटीतून प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा राजकीय मास्टरस्ट्रोक'; ठाण्यात भाजप-शिंदे गटात सूक्ष्म सत्तासंघर्ष..

MPSC Result: सर्व टप्पे पार करूनही यादीतून वगळले; ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’च्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची नाराजी

Shivraj Singh Chouhan : एक-दोन रुपये पीकविमा मिळणं ही थट्टा! अकोल्यातील शेतकऱ्याच्या तक्रारीची थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांनी घेतली दखल...

आनंदाची बातमी! सोलापुरातील १९ विद्यार्थी झाले सीए; १०८ विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा, राज्यात वाजताेय डंका..

SCROLL FOR NEXT