alia bhatt, rashmika mandana, nmaac event, alia bhatt and rashmika mandana dance video SAKAL
मनोरंजन

Alia Bhatt - Rashmika Video: आणि आलियाने नाचता नाचता चप्पल भिरकावली, आलिया- रश्मिकाचा 'नाटू नाटू' वर डान्स

RRR आणि Natu Natu गाण्याची क्रेझ कमी झाली नाहीये

Devendra Jadhav

Alia Bhatt - Rashmika Viral Video News: RRR मधील नाटू नाटू गाण्याने ऑस्करला बाजी मारल्यावर संपूर्ण देशातच नाही तर जगातच या गाण्याची क्रेझ नव्याने निर्माण झालेली दिसते.

गाण्याचा ऱ्हीदम आणि डान्स स्टेप्स यामुळे तर नाटू नाटू गाणं जास्तच फेमस होऊ झालं. अजूनही RRR आणि Natu Natu गाण्याची क्रेझ कमी झाली नाहीये. नुकतंच या गाण्यावर आलिया भट आणि रश्मीका मंदाना यांनी डान्स केलाय.

(Alia Bhatt and Rashmika mandana Video on rrr natu natu dance at nmaac event)

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) कार्यक्रमाच्या दुस-या दिवशी अभिनेत्री आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना यांनी RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्यावर डान्स केला.

या दोघांनी ऑस्कर-विजेत्या नाटू नाटू गाण्याच्या हिंदी व्हर्जनवर दमदार डान्स केलाय. व्हिडिओमध्ये, आलियाने एक लहान पांढरा ड्रेस घातला असून तर रश्मिका मंदान्नाने सोनेरी साडी नेसली होती.

रविवारी इंस्टाग्रामवर एका पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आलियाने स्टेजवर जाऊन तिची चप्पल काढली आणि स्टेजवरून खाली ठेवली.. डान्स करायच्या आधी त्या दोघी हसत असताना त्यांनी एकमेकांचा हात पकडला.

पुढे या दोघांनी Natu Natu वर हुक स्टेप करताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. व्हिडिओच्या शेवटी आलिया आणि रश्मीका यांनी एकमेकांना मिठी मारली.

रश्मीकाने याआधीही अहमदाबाद येथे इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या उद्घाटन समारंभात रश्मिकाने Natu Natu वर डान्स केला होता.

रश्मीका शेवटी 20 जानेवारीला रिलीज झालेल्या नेटफ्लिक्सवर प्रीमियर झालेल्या मिशन मजनू सिनेमात दिसली होती.

याशिवाय ती रणबीर कपूर आणि अनिल कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमलमध्येही दिसणार आहे. अॅनिमलचे दिग्दर्शन संदीप वंगा यांनी केले आहे .

अॅनिमल 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय रश्मीका 'पुष्पा 2' मध्ये अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.

आलियाच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. करण जोहरच्या आगामी रोमँटिक सिनेमा असलेला रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये रणवीर सिंग, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत आलिया दिसणार आहे. हा चित्रपट 28 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

याशिवाय दिग्दर्शक फरहान अख्तरचा पुढचा चित्रपट आहे जी ले जरा मध्ये कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत आलिया झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT