Ranbir Kapoor, Alia Bhatt Google
मनोरंजन

आलिया भटनं दिली ब्रेकिंग न्यूज;म्हणाली,'रणबीर अन् माझं लग्न झालंय'

'गंगूबाई काठियावाडी'च्या निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीनं केला खुलासा

प्रणाली मोरे

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट(Alia Bhatt) एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत ही बातमी काही नवीन नाही आपल्यासाठी. चर्चा तर सुरू होती या दोघांच्या लग्नाची पण आता अचानक आलियानं ब्रेकिंग बातमी दिलीय. रणबीर आणि माझं लग्न झालं आहे असं तिनं एका मुलाखतीत सागून त्यांच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली खरी पण केव्हा,कधी,कुठे असे अनेक प्रश्न सर्वांच्या समोर तिनं उभे केले आहेत. त्याविषयी तिनं थेट त्या मुलाखतीत स्पष्टिकरण दिलं आहे. काय म्हणाली आहे आलिया?

रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली ते अयान मुखर्जीच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या सेटवर. अद्यापतरी त्या दोघांनी त्यांच्या नात्याविषयी स्पष्ट खुलासा केला नसला तरी त्यांच्यातील नातं काही लपून राहिलेलं नाही. दोघे एकमेकांच्या कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसतात,दुःखात सहभागी झालेले दिसतात,अनेक सण-उत्सव एकमेकांच्या कुटुंबासोबत सेलिब्रेट करताना दिसतात यावरनं तर सगळंच स्पष्ट झालंय आतापर्यंत. इतकंच काय तर ते 'लीव्हइन' मध्ये राहत असल्यामुळे आता प्रेमाच्या कबुलीविषयी नाही तर थेट त्यांच्या लग्नाला घेऊन चाहता वर्ग उत्सुक दिसतोय. त्यातच आता 'गंगू्बाई काठियावाडी' स्टार आलिया भटने आपलं रणबीरशी लग्न झालंय म्हटल्याने लोकं मात्र विचारात पडली आहेत.

तर त्याचं झालं असं की,'गंगूबाई काठियावाडी'च्या निमित्नानं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आलियाला रणबीरशी लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ती तडक म्हणाली,''आमचं लग्न झालं आहे''. पण थोडा पॉज घेऊन लगेच म्हणाली,''माझ्या विचारांत ते केव्हाच झालंय. म्हणजे मी मनातनं कधीच स्वतःला त्याची बायको समजू लागले आहे''. तर आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी हा थोडा खुलासा. दोघांनी लग्न केलं नाही अद्यापतरी, आलियानं तिच्या डोक्यातला विचार बोलून दाखवला आहे. आता तो प्रत्यक्षात येवो म्हणजे मिळवला. अन्यथा रणबीरची आधीची प्रेमप्रकरणं,ब्रेकअप पाहता भावूक आलियाची थोडी काळजीच वाटते आहे. असो तिच्या डोक्यातला की मनातला जो काही विचार आहे तो प्रत्यक्षात येवो आणि लवकरच आलिया 'मिसेस.रणबीर कपूर' होवो या शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT