Alia Bhatt Google
मनोरंजन

आलियाने कोरोना नियमावलीचं उल्लंघन केलं नाही- BMC

आलियावर कारवाई होऊ शकत नसल्याचं केलं स्पष्ट

स्वाती वेमूल

निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) घरी झालेल्या पार्टीनंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. त्यातच अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) होम क्वारंटाइनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आलियाचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने तिच्याकडून क्वारंटाइन नियमांचं उल्लंघन झालं नाही, असं मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईबाहेर जाताना आलियाने कोरोना चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आलिया तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिल्लीला गेली होती. "रिपोर्ट निगेटिव्ह असताना प्रवास केला असेल तर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही", असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करणने त्याच्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये आलियासह करीना कपूर, अमृता अरोरा, महीप कपूर, सीमा खान यांच्यासह इतरही सेलिब्रिटी होते. पार्टीनंतर करीना, सीमा, अमृता आणि महीप यांना कोरोनाची लागण झाली. करण जोहरसह या पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांची कोविड १९ चाचणी करण्यात आली. करीना आणि अमृता यांनी घरातच स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. सात दिवसांनी त्यांची पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. या दोघींच्या फ्लॅट्स टाळेबंद करण्यात आल्या असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर आणि सोहैल खानच्या १० वर्षांच्या मुलालादेखील कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरसह त्याच्या कुटुंबीयांची RTPCR चाचणी करण्यात आली असता सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

करण जोहरने माध्यमांना फटकारलं-

'माध्यमांच्या काही सदस्यांना मी सांगू इच्छितो की ८ जण एकत्र आले की पार्टी होत नाही आणि माझं घर हे काही कोविडचं हॉटस्पॉट नाही. आम्ही घरात काटेकोरपणे नियमांचं पालन करतो. आम्ही सर्वजण जबाबदार नागरिकांप्रमाणे वागतोय आणि मास्कचा सतत वापर करतोय. तथ्य काय आहे याची पडताळणी न करता वृत्त देणाऱ्या काही माध्यमांच्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनी संयम बाळगावा', अशी पोस्ट करण जोहरने लिहिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Women: मला न कळवता तीने गोवा सोडलं... गोकर्ण जंगलाच्या गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा पती प्रथमच समोर, धक्कादायक माहिती

Bokaro Naxal Encounter : २५ लाखाचं बक्षीस असलेला नक्षलवादी ठार! सुरक्षा दल-नक्षलवाद्यांत तीव्र गोळीबार; कोब्रा बटालियनचा जवानही शहीद

Nagpur News : विद्यार्थी नसलेल्या तीनशे महाविद्यालयांना वेतनासाठी कोट्यवधींचे अनुदान; जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश

Mahadev Munde Case: आरोपींना अटक नाहीच, Dnyaneshwari Munde यांनी उचललं टोकाचं पाऊल | Beed News

Nagpur Rain : पूर नुकसानीचा अहवाल थंडबस्त्यातच; नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदतीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT