Alia Bhatt does not regret decision to have baby.. Google
मनोरंजन

Alia Bhatt:'करिअरच्या शिखरावर असताना मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेणं म्हणजे..' आलिया भट्ट स्पष्टच बोलली

आलिया भट्टनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच बाळाला जन्म दे्ण्याच्या निर्णयावर वक्तव्य केलं आहे.

प्रणाली मोरे

Alia Bhatt: आलिया भट्ट ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. गेले वर्ष तिच्यासाठी खूप खास होते. तिने केवळ बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत लग्नच केले नाही तर ती पहिल्यांदा आईही बनली आहे. आलिया भट्टने नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. आलिया भट्टने लग्न करून लगेच आई होण्याचा निर्णय घेतला तेव्हा जो तो ते कळल्यावर हैराण झाला होता. करिअरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचा हा निर्णय सगळ्यांसाठीच शॉकिंग होता. (Alia Bhatt does not regret decision to have baby..)

सहसा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न करणे टाळतात. याबाबत प्रत्येकाची धारणा वेगळी असते. आलिया भट्टने नुकतीच एका इंग्रजी वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चित्रपट कारकिर्दी व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याविषयी देखील मनमोकळा संवाद साधला. यादरम्यान आलिया भट्टला विचारण्यात आले की, 'तिने करिअरच्या शिखरावर असताना लग्नाची घाई का केली आणि आई होण्याचा निर्णय इतक्या लवकर का घेतला?'

यावर आलिया म्हणाली, ''होय, करिअरच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मी लग्न करून आई होण्याचा निर्णय घेतला. पण लग्न करून किंवा आई झाल्यावर माझ्या कामावर त्याचा परिणाम होईल असे कोणाला वाटते? आणि तसं झालं तरी मला त्याची पर्वा नाही. एक कलाकार म्हणून माझा स्वतःवर विश्वास आहे. तुम्ही मेहनत केलीत, आणि चांगले कलाकार असाल तर तुम्हाला काम मिळेल. शेवटी हा तुमचा वैयक्तिक प्रश्न असतो तुम्हाला कधी काय करायचे आहे''. याशिवाय आलिया भट्टने इतरही अनेक गोष्टी केल्या आहेत.

आता आलिया लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या लव्हस्टोरीमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. आता बघूया आलियाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे किती प्रेम मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT