alia bhatt give new game challenge to fans on Instagram check video  
मनोरंजन

आलिया भट्टने चाहत्यांना दिलं गंगूबाई चॅलेंज, तुम्हीही करा ट्राय..

सकाळ डिजिटल टीम


आलिया भट्ट (Alia Bhatt च्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून लोक वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया भट्टचा जबरदस्त अभिनय आपण सर्वांनीच पाहिल आहे आता चित्रपटातील गाणीही चाहत्यांना चांगलीच आवडत आहेत. इतकेच नाही तर बर्लिन फिल्म फेस्टिव्हल (Berlin Film Festival) मध्ये 'गंगूबाई काठियावाडी'चा प्रीमियर (Premier) देखील होणार आहे, त्यासाठी आलिया आणि संजय लीला भन्साळी बर्लिनला गेले आहेत.

या सगळ्यात आलिया भट्ट ही तिच्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि सतत काहीतरी पोस्ट करत असते. यातून बऱ्याचदा ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्सही देत ​​असते.

आलिया भट्ट सोबत तिची बहीण शाहीन भट्ट देखील बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सोबत गेली आहे. त्यासंबंधी आलियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या चाहत्यांना एका गेमचे आव्हान देताना दिसत आहे. व्हिडीओत आलियाने एक प्लेइंग कार्ड उचलले. यानंतर शाहीन एक कार्ड उचलते. दोन्ही कार्ड्सचे चुंबन घेतात. यानंतर दोन्ही कार्ड कॅमेऱ्यात दिसतात. ज्याचे कार्ड मोठे असते, तो जिंकतो.

आलिया भट्ट हीने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, "हा खूप मजेदार गेम आहे. आपला पार्टनर निवडा. कार्ड्सचा एक डेक घ्या … त्यामधून तुमचं एक कार्ड निवडा. त्या कार्डला किस करा आणि ते कार्ड दाखवा. जे मोठे कार्ड असेल ते जिंकेल. जा, जा, जा!". या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटातील 'जब सैयां' हे गाणे वाजत आहे. तसेच आलिया आणि शाहीन दोघीही कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसत आहेत.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या या चित्रपटाने आतापर्यंत चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट येत्या 25 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होत आहे. प्रेक्षकांकडून ट्रेलरने बरीच प्रशंसा मिळवली आहे, मात्र चित्रपट त्यांच्या अपेक्षा पुर्ण करेल की नाही हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT