Ranbir & Alia wedding Photo Instagram
मनोरंजन

लग्नात फेऱ्यांपेक्षा जास्त 'Kiss' केल्यानं रणबीर-आलिया झाले ट्रोल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल,२०२२ रोजी लग्नगाठ बांधली आहे.

प्रणाली मोरे

बॉलीवूडचं सर्वात सुंदर आणि चर्चेतलं कपल रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांनी १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाचे फोटो सध्या चर्चेत आहेत आणि सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरलही झाले आहेत. या दोघांचे काही फोटो जेवढे पसंत केले जातायत तेवढंच त्या फोटोवरुन रणबीर आलियाला ट्रोलही केलं जात आहे.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्नात किस करतानाचे बरेच फोटो समोर आले आहेत. त्या दोघांच्या एका किसिंग फोटोला सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. रणबीर-आलिया वर-वधूच्या पेहरावात दिसत आहेत. दोघे खूप सुंदरही दिसत आहेत. या फोटोत ते दोघे एकमेकांना किस करीत आहेत. जिथे एकीकडे आलिया-रणबीरच्या किसिंग फोटोला चाहत्यांची भरघोस पसंती मिळतेय तिथे दुसरीकडे काही नेटकरी मात्र रणबीर-आलियाला या किसिंग फोटोमुळे ट्रोल करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,''यांच्या लग्नात आई किंवा मोठे नातेवाईक नसतात का? फेऱ्यांपेक्षा जास्त तर यांनी किस लग्नात घेतले आहेत''. आणखी एका नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं आहे,''दोघं एकमेकांच्या तोंडात हवा भरत आहेत का? लग्नात अशी हरकत करतं का कुणी? हे कसलं लग्न,ना मंगळसूत्र,ना कन्यादान,ना माथ्यावर बिंदी''. इतरही अनेक नेटकऱ्यांनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट च्या किसिंग फोटोवर कमेंट करत त्यांना ट्रोल केलं आहे.

गेली पाच वर्ष रणबीर-आलिया रीलेशनशीपमध्ये होते. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या सेटवर या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. आणि अखेर रणबीर कपूर अन् आलिया भट्टने आपले जवळचे कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मुंबईतील 'वास्तु' इमारतीमधील घरात लग्नगाठ बांधली. त्यांच्या या लग्नाच्या निमित्तानं काही सेलिब्रिटींनी रीसेप्शन पार्टीला हजेरी लावली होती. १६ एप्रिल रोजी हे ग्रॅंन्ड रीसेप्शन पार पडलं. या पार्टीत शाहरुख खान,गौरी खान,करण जोहर,तारा सुतारिया,करिना कपूर,सैफ अली खान अशा अनेकांनी हजेरी लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT