Jethalal and Shehnaaz Gill's memes have gone viral amid Ranbir Kapoor and Alia Bhatt's wedding celebrations. Google
मनोरंजन

Ranbir Alia Wedding: लग्नावरुन शहनाझ गिल,जेठालालचे अतरंगी मीम्स व्हायरल

रणबीर आलियाच्या लग्नाची चाहते एकीकडे चातकासारखी वाट पाहत असताना दुसरीकडे व्हायरल मीम्सनी नुसती धम्माल आणलीय.

प्रणाली मोरे

आलिया(Alia Bhatt)-रणबीर(Ranbir Kapoor)च्या लग्नाच्या बातम्या जेव्हापासून व्हायरल झाल्या तेव्हापासून चाहते त्यांच्या डोक्यावर कधी अक्षता पडतायत याचीच वाट पाहतायत. पण काही दिवसांपासून लग्नाच्या तारखेवरुन जो घोळ उडालाय यावरनं सोशल मीडियावर मात्र या लग्नाविषयी अतरंगी मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर यात मीडियालाही गोवलंय. लग्नाच्या निमित्तानं मीडियाच्या होणाऱ्या पळापळीवरही काही मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी कहरच केलेला दिसून आलाय. त्यांनी चक्क रणबीर-आलियाच्या आधीच्या अफेअर्सचीही मीम्सच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे.

ट्वीटरवर एका चाहत्यानं लिहिलंय,''आणखी एक बॅचलर जाळ्यात अडकला...त्यापुढे हार्टब्रेकिंग लिहित ब्रेक्रिंग हार्ट इमोजी देखील पोस्ट केलेयत. त्यावर मुलींनी एकदम शहनाझ गिलच्या स्टाईलमध्ये लिहिलंय,''क्या करु मै मर जाऊॅं....'' तर एका नेटकऱ्यानं रणबीर-मीडियाच्या लग्नाच्या बातम्यांचे कव्हरेज करणाऱ्या मीडियाची थेट नासामधील शास्त्रज्ञांचीच तुलना करुन टाकलीय. त्या मजेदार मीम्सची लिंक इथे बातमीत जोडलेले आहेत.

अनेकांनी आपापल्या डोक्यातील कल्पनेचं टोकाचं टोक गाठत मीम्स सोशल केलेयत ते पाहण्यासारखे आहेत. एक माणूस पलंगावर पैसे पसरवून त्यावर झोपलाय आणि त्याला कॅप्शन दिलंय की,''सध्या मनिष मल्होत्रा असा एन्जॉय करीत असेल''. म्हणजेच लग्नातील फॅशनेबल कपड्यांचं मोठं डील मनिषच्या हाती लागल्यानं सध्या तो पैसे मोजत बसला असेल असं या मीम मधून म्हणायचंय बहुधा.

Memes on ranbir-alia wedding

एकानं तर थेट प्रसिद्ध मालिका 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालालला मध्ये आणलंय. ज्याचा बिचाऱ्याचा लग्नाशी दूरदूरपर्यंत संबंध नसेल. या मीममध्ये टेंटमध्ये जेठालाल छोट्या स्टोव्हवर जेवण करत बसलाय. त्याला कॅप्शन दिलंय,''सध्या रणबीर-आलियाच्या घरासमोर मीडिया अशा अवस्थेत असेल''. असे अनेक मजेदार मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहून हसून पुरती वाट लागली नाही तर नवल.

Memes on ranbir-alia wedding

आलिया-रणबीर १४ एप्रिलला लग्न करत आहेत,आज १३ एप्रिलपासून विवाहसोहळ्यांना सुरुवात झाली देखील. त्यामुळे सोशल मीडियावरही या लग्नाची जोरदार चर्चा रंगलेली दिसतेय. अर्थातच या दोन्ही स्टार्सच्या प्रेमाखातरच सगळं होतंय बरं का. आपण आनंद घ्यायचा स्टार्सच्या लग्नाचा अन् लग्नावरनं व्हायरल होणाऱ्या मीम्सचासदेखील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT