Ranbir Kapoor And Alia Bhatt Google
मनोरंजन

आलिया-रणबीरचा विवाहसोहळा 13 ते 17 एप्रिल दरम्यान कपूर मेन्शनमध्ये रंगणार

येत्या १७ एप्रिल २०२२ रोजी कपूर मेन्शन मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नबंधनात अडकणार आहेत.

प्रणाली मोरे

गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडच्या ज्या लग्नाविषयी अधिक उत्सुकता होती ते फायनली आता होत आहे. येत्या १७ एप्रिल २०२२ रोजी कपूर मेन्शन मध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १३ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान या दोघांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पाच दिवसात रिंग सेरिमनी,हळद,संगीत असे विविध विवाहसंबंधित कार्यक्रम पार पडणार आहेत. दोघांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक,मित्रपरिवारच उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. लग्नाचा फार मोठा तामझाम करायचा नाही असा निर्णय आलिया(Alia Bhatt)-रणबीरनं(Ranbir Kapoor) घेतला आहे. ज्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या सेटवर कामाच्या निमित्तानं रणबीर-आलिया जवळ आले,त्या सिनेमाला प्रदर्शनाची तारीख मिळालेली नसली तरी या दोघांच्या लग्नाच्या तारखेवर मात्र शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय.

आलिया-रणबीरच्या मेहेंदी,हळद,संगीत कार्यक्रमासाठी नातेवाईक-मित्रपरिवाराला निमंत्रण गेल्याचं कळत आहे. या दोघांनी आपल्या सर्व निमंत्रक आप्तेष्टांना १३ ते १७ एप्रिल दरम्यान विवाहसोहळ्यासाठी उपस्थित रहायचं खास निमंत्रण दिलं आहे. पिंकव्हिला वेबसाईटच्या माहितीनुसार,आलिया लग्नामध्ये मनिष मल्होत्रा आणि सब्यासाचीचे आऊटफिट्स घालणार असल्याचं कळत आहे. तसंच,लग्नात फक्त जवळचे कुटुंबिय,मित्रपरिवार उपस्थि राहणार असला तरी बॉलीवूडमधील आपल्या खास मित्रपरिवाराला या एप्रिल महिन्याच्या शेवटी मोठी रीसेप्शन पार्टी हे दोघे देणार आहेत. रिषी कपूर आणि नीतू कपूर यांच्याप्रमाणेच रणबीर-आलिया कपूर मेन्शनमध्ये सात फेरे घेणार आहेत. त्यामुळे अर्थात खास भावनिक बंध देखील या लग्नाशी जोडले गेले आहेत.

बातमी कळतेय की आलिया भट्टचे आजोबा नरेंद्रनाथ राजदान यांची तब्येत खूप बिघडली आहे आणि त्यांची आलिया आणि रणबीरचं लग्न पाहण्याची इच्छा आहे. त्यामुळे आलियाच्या कुटुंबाला हे लग्न लवकर व्हावं असं वाटत होतं. त्यामुळेच आता १७ एप्रिललाच लग्न मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत होणार असल्याचं कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT