Alia Bhatt shares first photo of herself after becoming a ‘mama’
Alia Bhatt shares first photo of herself after becoming a ‘mama’  Google
मनोरंजन

Alia Bhatt: आई झाल्यानंतर आलियानं पहिल्यांदाच पोस्ट केला फोटो, दाखवली एक खास गोष्ट

प्रणाली मोरे

Alia Bhatt:बॉलीवूडची क्युट गर्ल आलिया भट नुकतीच आई झाली आहे आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिलाय आई झाल्यानंतर आलियाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर केला आहे. नुकताच आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलाय. (Alia Bhatt shares first photo of herself after becoming a ‘mama’)

या फोटोमध्ये आलिया ब्लर दिसतेय मात्र तिच्या तिच्या हातात असलेला कप स्पष्ट दिसतोय लाल रंगाच्या या कफ वर 'ममा' असं लिहिलेला आहे. आलियाच्या या फोटोवरूनच सध्या ती तिच्या मातृत्वाचे सुखद क्षण अनुभवत असल्याचं लक्षात येतंय.

आलियाने फोटोला 'इट्स मी' असं कॅप्शन दिलंय. सोबत तिने पिवळ्या रंगाच्या हार्टचा इमोजी पोस्ट केलाय. सोशल मीडियावर आलियाच्या या फोटोला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय. तिने हा फोटो अपलोड केल्यानंतर केवळ अर्धा तासाच्या आतच या फोटोला 200 हजार हून अधिक लाईक मिळाले आहेत तर हजारो कमेंट्स आल्या आहेत. अनेक नेटकरांनी आलियाला मुलीचं नाव काय ठेवणार असा प्रश्न विचारला आहे तर काही चाहत्यांनी तर तिच्याकडे मुलीचाही फोटो शेअर करण्याची मागणी केली आहे.

एका युजरने लिहिले 'चला आता मुलीचा फोटो दाखवा नाहीतर किमान तिचं नाव तरी सांगा हे सगळं काय आहे. 'तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं 'आम्हाला तुमच्या बाळाचा फोटो पाहायचा आहे प्लीज तिचा फोटो शेअर करा.' तर अनेक नेटकऱ्यांनी आलिया आणि तिच्या बाळाला शुभेच्छा दिल्या आहेत.

तर दिग्दर्शिका झोया अख्तर ,अभिनेता टायगर श्रॉफ तसंच मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आलियाच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत.

दरम्यान आलिया सध्या तिच्या बाळासोबत वेळ घालवत आहे. तर दुसरीकडे रणबीर कपूरने मात्र कामाला सुरुवातही केलीय. नुकतच एका सिनेमाच्या सेटवर रणबीरला स्पॉट करण्यात आलं होतं. लवकरच तो 'एनिमल' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नवीन वर्षात म्हणजेच 2023 सालामध्ये आलिया रणवीर सिंग सोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातून झळकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT