Bhau Kadam: 'समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि मला हसू आवरत नव्हतं…', भाऊला आठवला शांताराम परब Timepass 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhau Kadam

Bhau Kadam: 'समोर एकेक हत्यार ठेवलं जात होतं आणि मला हसू आवरत नव्हतं…',भाऊला आठवला शांताराम परब

Bhau Kadam: आपल्याला खळखळून हसवणारे विनोदी कलाकार , एखादा कॉमेडी सीन कसा करत असतील? शेवटी कलाकार पण माणसेच असतात. समोर काहीतरी विनोदी घडत असताना त्यांनाही हसू आवरणं कठीण होत असणार. पण आपण न हसता विनोदाचं टायमिंग पकडत कॉमेडी सीन करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असतं.

असा एक भन्नाट सीन टाइमपास ३ या सिनेमात पहायला मिळतो. साध्या सरळ , रिक्षाचालक असलेल्या शांताराम परबसमोर डेंजरडॉन दिनकर पाटील एकेक हत्यार समोर ठेवत असताना चेहऱ्यावर भीती आणि ओठावर दाबून ठेवलेलं हसू अशी गोची पहायला भारी मजा येईल ना. टाइमपास ३ या सिनेमातील भाऊ कदम आणि संजय नार्वेकर यांच्या ज्या सीनची जोरदार चर्चा झाली त्या सीनची मजा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी आणली आहे झी टॉकीजने.(Bhau Kadam Timepass 3 memory, shooting, shantaram parab)

हेही वाचा: Arbazz Khan: 21 वर्षांनी लहान जॉर्जियाला डेट करतोय अरबाज, एज गॅपवर बोलताना लग्नाचीही दिली हिंट

झी टॉकीज आणि सिनेमा यांचं खास नातं आहे. दर्जेदार सिनेमांच्या निर्मितीसह प्रेक्षणीय सिनेमे प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करण्यासाठी झी टॉकीज नेहमीच पुढाकार घेत असत. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतरही त्या सिनेमांचा प्रेक्षकांना आस्वाद घेण्याची संधी झी टॉकीज प्रेक्षकांना देत असते. आजवर झी टॉकीजने प्रेक्षकांना घरबसल्या सिनेमा पाहण्याचा आनंद दिला आहे. याच पंक्तीत आता रविवार दि. २० नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर टाइमपास ३ या सिनेमाची पर्वणी मिळणार आहे.

मराठीमध्ये सिक्वेल सिनेमाचा फंडा हिट करण्यात टाइमपास ३ या सिनेमाने बाजी मारली आहे. टाइमपास सिनेमाशी पहिल्या भागापासून जोडलेल्या कलाकारांमध्ये अभिनेता भाऊ कदमदेखील आहे. दगडू या नायकाच्या वडीलांचे म्हणजे शांताराम परब हे पात्र भाऊ कदमने साकारले आहे. रिक्षाचालक असलेल्या शांतारामला मुलगा दगडूने खूप शिकावं आणि घरच्या गरीबीचा कायापालट करावा असं वाटतं. टाइमपास ३ मध्ये दगडू सभ्य झाल्यामुळे शांताराचं हे स्वप्नं पूर्ण झालंय. सभ्य दगडूच्या आयुष्यात येणारी डेंजर डॉनची मुलगी पालवी, डॉन आणि शांताराम यांच्यातील नव्या नात्याची सुरूवात दाखवणारे सीन भाऊने कमाल केले आहेत.

हेही वाचा: Disha Salian Case: दिशाच्या आत्महत्येपूर्वीचा एक एक क्षण अंगावर काटा उभा करेल, बॉयफ्रेंड रोहन रायचा खुलासा

या सिनेमाच्या निमित्ताने भाऊ कदम म्हणाला, “ टाइमपास ३ हा सिनेमा जितका प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे तितकाच आम्हा कलाकारांनाही तो शूट करताना मजा आलीय. या सिनेमातील असे काही सीन आहेत की जे करताना मलाही हसू आवरत नव्हतं. हा सिनेमा कधी पाहताना मला मी दाबून ठेवलंलं हसू आठवतं. या सिनेमात एक सीन आहे. पालवीचे वडील जे डॉन आहेत म्हणजेच दिनकर पाटील , पालवीचं प्रेम दगडूवर आहे हे कळल्यावर शांताराम च्या घरी येतात तेव्हा दगडू आणि पालवीच्या नात्याविषयी त्यांचे बोलणे सुरु होत असते. मात्र बोलताना दिनकर पाटील एक एक करून खिशातील पिस्तूल, सुरा असं एकेक हत्यार शांताराम समोर काढून ठेवायला सुरु करतात.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: 'माझ्यातला शाकाल जागवलाय तु्म्ही..; अपूर्वा भडकली

डॉन दिनकरची भूमिका करणारा संजय नार्वेकर हा सीन करत होता. त्याची ती भाईगिरीची भाषा, एकेक हत्यार समोर ठेवत बोलणं हे बघून खरंतर शांतारामला घाबरायचं होतं. पण माझ्यातील भाऊ हसायचं काही थांबेना. तो अख्खा सीन होईपर्यंत मी हसत होतो. जेव्हा कॅमेरा संजयकडे असायचा तेव्हा समोर मला हसू फुटत होतं. कॅमेरा माझ्याकडे आला की तेवढयावेळापुरता मी गंभीर लुक द्यायचो. आमचा हा सीन असा शूट झालाय. जेव्हा जेव्हा मी टाइमपास ३ बघतो किंवा या सिनेमाविषयी बोलतो तेव्हा मला या सीनच्या शूटचा किस्सा आठवल्याशिवाय राहत नाही.”

हेही वाचा: Ranveer Singh: बड्या निर्मात्याचं रणवीरसोबत लज्जास्पद कृत्य; म्हणाला, 'कुत्रा अंगावर सोडत...'

टाइमपास ३ मध्ये सुधारलेल्या दगडूच्या वडीलांच्या शांताराम परबच्या भूमिकेतील भाऊ कदमच्या भन्नाट अभिनयाची पर्वणी झी टॉकीज वाहिनीवर रविवारी २० नोव्हेंबरला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शित होणाऱ्या टाइमपास ३ या सिनेमाने मिळणार आहे. भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर असून शांताराम परबचा हा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.