Kriti Sushant Alia  esakal
मनोरंजन

राब्ता : कृति सेनन नाही, तर आलियाच होणार होती सुशांतची 'हिरोईन'; पण..

Balkrishna Madhale

सातारा : सुशांत सिंह राजपूतचं (Sushant Singh Rajput) निधन होऊन आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. सुशांतचं असं अचानक निघून जाणं हे केवळ त्याच्या कुटुंबीयांसाठीच नाही, तर बाॅलिवूड इंडस्ट्री (Bollywood Industry) आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का होता. मात्र, त्याची आठवण आजही लोकांच्या मनात कायम घर करुन आहे. सुशांत हा इंडस्ट्रीचा उदयोन्मुख सुपरस्टार होता, ज्याला बॉलिवूडचा अजून खूप लांबचा पला गाठायचा होता. पण, त्याच्या बाबतीत तसं काहीच घडलं नाही आणि त्यानं अचानक या जगाचा निरोप घेतला. सुशांतनं 'काय पो छे', 'एमएस धोनी', 'पीके', 'छिछोरे', 'केदारनाथ', असे अनेक यशस्वी चित्रपट दिले. त्याचे काही चित्रपट हिट ठरले, तर काही फ्लॉप. पण, प्रत्येक चित्रपटात त्याच्या पात्रांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. (Alia Bhatt Was Going To Be Sushant Singh Rajput Actress In Raabta But Did Not Do Film)

चार वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि कृति सेननचा 'राब्ता' (Raabta Film) चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

चार वर्षांपूर्वी सुशांत सिंह राजपूत आणि कृति सेननचा 'राब्ता' (Raabta Film) चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. परंतु, सुशांत आणि क्रितीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. दरम्यान, सर्वत्र अशीही एक चर्चा होती, की आलिया भट्ट (Alia Bhatt) कृति सेननच्या आधी सुशांतची नायिका बनणार होती. पण, एका विशेष कारणामुळे तिनं हा चित्रपट करण्यास नकार दिला. एवढंच नाही, तर सुशांतच्या निधनानंतर तिच्यावर टीकेची झोडही उठली होती. चला तर, जाणून घेऊ आलियानं सुशांतची नायिका होण्यास का नकार दिला ते..

Alia Bhatt Kriti Sanon

'राब्ता' 9 जून 2017 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात सुशांत आणि कृति (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन दिनेश विजेन यांनी केलं होतं. ही एक रोमॅंटिक अ‍ॅक्शन फिल्म होती. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती 2015 मध्ये सुरू झाली होती आणि हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, कास्टिंगच्या मुद्द्यांमुळे या चित्रपटास उशीर झाला. या चित्रपटाचे चित्रीकरण बुडापेस्ट, हंगेरी आणि भारतामध्ये झाले होते. या चित्रपटाच्या वेळीच कृति आणि सुशांत एकमेकांच्या जवळ आले होते. बहुतेक लोकांना हेही ठाऊक नाही, की सुशांतनं या चित्रपटासाठी 'हाफ गर्लफ्रेंड' हा चित्रपट नाकारला होता. त्यानंतर ही भूमिका अर्जुन कपूरला देण्यात आली. दरम्यान, आलिया भट्टला 2015 मध्ये सुशांतसोबत ‘राब्ता’मध्ये साइन करण्याची चर्चा होती. मात्र, तिनं करण जोहरच्या 'शुद्धी' चित्रपटाला आधीच साइन केल्यामुळं या चित्रपटात ती सुशांतची नायिका बनू शकली नाही.

Kriti Sanon Sushant Rajput

राब्ता आणि शुद्धी या दोन्ही चित्रपटांची कथा पुनर्जन्मावर आधारित होती, त्यामुळे आलियाला फक्त एका चित्रपटाला हो म्हणायचं होतं. अशा स्थितीत तिनं 'शुध्दी'ला हो म्हणत 'राब्ता'मध्ये काम करण्यास नकार दिला. परंतु, त्यानंतर 'शुद्धी' चित्रपट होऊच शकला नाही. सुशांतच्या निधनानंतर, आलिया देखील ट्रोलिंगचा बळी ठरली होती. वास्तविक, सुशांतच्या चाहत्यांना आलिया भट्टबद्दल नेपोटिजमच्या मुद्द्यावरून राग आला होता. 'कॉफी विथ करण चॅट शो'वरील एका प्रश्नादरम्यान आलियानं असे सांगितले होते, की काल्पनिकरित्या (Hypothetically) ती सुशांतची हत्या करेल. तिनं ते विधान हसत केलं होतं. पण, तेच जुने व्हिडिओ पाहून चाहत्यांना प्रचंड राग आला.

Kriti Sushant

राब्ता चित्रपटाला 4 वर्ष पूर्ण झाल्यावर कृति सेनननं चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली. त्यात तिनं लिहिलं होतं, चित्रपट येतात आणि जातात; पण प्रत्येक चित्रपटाच्या मागं बर्‍याच आठवणी लपलेल्या असतात, ज्या नेहमी आपल्याला आठवण करुन देतात. आपण बनविलेली नाती आणि एकमेकांसोबत घालवलेले क्षण ते कधीच विसरता येत नाहीत, कारण ते आपले असतात. 'राब्ता' हा माझा सर्वोत्तम आणि अविस्मरणीय अनुभव होता. राब्तामुळं मला खूप काही शिकायला मिळालं, सुशांतसारखा एक चांगला मित्र मला 'राब्ता'च्याच सेटवर मिळाला. पण मला माहित नव्हतं, की हा आमचा पहिला आणि शेवटचा चित्रपट असेल.. अशी तिनं भावनिक पोस्ट शेअर केली होती.

Alia Bhatt Was Going To Be Sushant Singh Rajput Actress In Raabta But Did Not Do Film

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

Magnesium & Vitamin D Deficiency: व्हिटॅमिन-D ची पातळी कमी होण्यामागे असू शकतो 'या' खनिजांचा अभाव, 'हे' अन्नपदार्थ ठरतील उपयुक्त

SCROLL FOR NEXT