Alia Bhatt's grandfather Narendra Razdan in a critical condition, actress cancels IIFA 2023 foreign trip sakal
मनोरंजन

Alia Bhatt: प्रकृती खालावली! आलिया भट्टचे आजोबा रुग्णालयात दाखल; एअरपोर्टवरुन परतली अभिनेत्री

हातातली सर्व कामं टाकून आलियाही रुग्णालयात उपस्थित..

नीलेश अडसूळ

Alia Bhatt: बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट हिचे आजोबा म्हणजेच सोनी राजदान यांचे वडील नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे. या कारणामुळे अभिनेत्रीने आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

आलिया iifa 2023 साठी दुबईला निघाली होती. परंतु विमानतळावरच तिला ही बातमी समजल्याने ती तिथूनच घरी परतली. सध्या तिच्या आजोबांवर रुग्णालयात उपचार सुरू असून तर अत्यावस्थ अवस्थेत आहेत.

(Alia Bhatt's grandfather Narendra Razdan in a critical condition, actress cancels IIFA 2023 foreign trip)

बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. तिच्या अभिनयाला आणि सौंदर्याला तोड नाही. नुकताच तिला 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आणि सध्या ती आयफा 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी अबुधाबीला निघाली होती.

मात्र वाटेतच एक वाईट बातमी तिला समजली आणि ती मागे फिरली. आलियाच्या आईचे वडील, म्हणजे आजोबा नरेंद्र राजदान यांची प्रकृती खालावली आहे. तिचे आजोबा अत्यावस्थ असून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना यापूर्वीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता प्रकृती अधिक खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आलिया आपल्या आजोबांच्या फारच जवळ आहे. त्यामुळे तिला ही बातमी कळताच ती सर्व कामे सोडून रुग्णालयात पळाली. आजोबांचे वय 95 वर्षे असून त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT