gangadhar tipre 
मनोरंजन

रसिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'; वाचा कधी येणार तर...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई ः 2001 साली झी मराठी वाहिनीवर श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका आली होती आणि तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
आजही कित्येकांच्या मनात ही मालिका कायम आहे. एक आदर्श एकत्र कुटुंब नेमकं कसं असावं हे या मालिकेतून उत्तमरित्या मांडण्यात आलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता हीच मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  झी मराठी वाहिनीवर येत्या 15 जूनपासून सायंकाळी साडेसात वाजता ही मालिका प्रसारित होईल.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या एका दैनिकातील सदरावर ही मालिका आधारित होती. सन 2001 मध्ये ती सुरू झाली आणि सन 2005 मध्ये तीने प्रेक्षकांचा निरोप घेतला. केदार शिंदेने ही मालिका दिग्दर्शित केली होती. यातील विनोद सहज सुंदर आणि खुसखुशीत होते. प्रेक्षकांना ते कमालीचे भावले होते. आता लॉकडाऊनमध्ये ही मालिका प्रेक्षकांचे निश्चित मनोरंजन करील हे निश्चित. या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी गंगाधर टिपरे यांची भूमिका साकारली होती. 

अभिनेता राजन भिसे आणि अभिनेत्री शुभांगी गोखले हे त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या भूमिकेत दिसले होते. तर विकास कदमने (शिऱ्या) त्यांच्या नातवाची तर, रेश्मा नाईकने (शलाका) नातीची भूमिका साकारली होती. एकत्र कुटुंबाची ही कथा लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांच्या टेन्शनची मात्रा कमी करण्यासाठी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विनोद हे किती सहज असतात, हे या मालिकेतून समजतं आणि आता त्याच विनोदांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू उमटणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT