Allu Arjun 
मनोरंजन

'तुम्हाला गृहित धरणार नाही'; चाहत्यांच्या गोंधळानंतर अल्लू अर्जुनची सारवासारव

कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या गोंधळात काही चाहते जखमी झाले.

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) एका कार्यक्रमात चाहत्यांनी गोंधळ घातला. सोमवारी १३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनने चाहत्यांसोबतची भेट आणि फोटो सेशन रद्द केल्यामुळे जमा झालेले चाहते संतापले. त्यामुळे सायबराबादमधील एन-कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तणाव वाढला. अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याआधी आयोजकांनी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी फक्त २०० लोकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कार्यक्रमस्थळी अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या गोंधळामुळे आयोजकांनी कार्यक्रम रद्द केला. अखेर चिडलेल्या चाहत्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मालमत्तेचं नुकसान केलं.

या गोंधळात काही चाहते जखमी झाले. संबंधित घटनेविषयी अल्लू अर्जुनने ट्विट केलं. 'माझ्या कार्यक्रमातील गोंधळामुळे काही चाहत्यांना दुखापत झाली. माझी टीम वैयक्तिकरित्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मला अपडेट देत आहे. यापुढे, अशा घटना घडू नयेत यासाठी मी खूप काळजी घेईन. तुमचं प्रेम ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि मी त्याला कधीही गृहीत धरणार नाही', असं अल्लू अर्जुनने लिहिलं.

चाहत्यांच्या गोंधळात पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे. आणखी एका घटनेत मित्री मूव्ही मेकर्सविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ५ हजार लोकांनी परवानगी असताना १५ हजारहून अधिक लोक जमा झाले होते.

आगामी 'पुष्पा' या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय जगपती बाबू, प्रकाश राज, धनंजय, अनसूया भारद्वाज, हरीश उथमन आणि वेनेला किशोर यांनी चित्रपटात सहाय्यक भूमिका केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT