Pushpa 2 The Rule  Esakal
मनोरंजन

Pushpa 2 Teaser: 'पुष्पा जिंदा है! 'पुष्पा 2'चा दुसरा धमाकेदार टीझर रिलीज.. अल्लू अर्जुनचा रावडी लूक रिव्हिल..

Vaishali Patil

अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. झुकेगा नही साला म्हणणारा पुष्पा लोकांना आवडलाच शिवाय पुष्पाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा सुपरहिट कामगिरी केली. आता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे.

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चा दुसरा टीझर रिलीज केला आहे. 3 मिनिट 14 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये चाहत्यांना त्यांच्या अनेक प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. सुरवातीला पुष्पा कुठे आहे हा प्रश्न आहे. उपस्थीत झाला होता.

'पुष्पा 2' चा पहिला टीझर रिलीज झाला होता. गोळ्या लागल्याने जखमी झालेली पुष्पा तुरुंगातून पळून गेल्याचे या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. पुष्पाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. अशा स्थितीत पुष्पा कुठे आहे, असा प्रश्न पडला होता. या प्रश्नाचे उत्तर निर्मात्यांनी दुसरा टीझर रिलीज करून दिले आहे

'पुष्पा 2' च्या टीझरमध्ये निर्मात्यांनी या प्रश्नाचे उत्तर इतके जोरदार पद्धतीत दिले आहे. टिझर रिलीज झाल्यावर तो यूट्यूबवर व्हायरल झाला आहे. या टीझरमध्ये पुष्पा जंगलाच्या मध्यभागी दिसताच सिंहही गर्जना करत दोन पावले मागे सरकतांना दिसत आहे.

3 मिनिटांच्या या टीझरमध्ये प्रत्येकजण पुष्पाला (पुष्पा 2) शोधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पुष्पा बेपत्ता झाल्यानंतर त्याचे चाहते कसे रस्त्यावर उतरले असून ते संतप्त आहेत, जाळपोळ करत असल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, जंगलातील एक दृश्य दाखवण्यात आले आहे ज्यात सिंह गर्जना करतो आणि कोणाच्या तरी पायाचा आवाज ऐकून दोन पावले मागे सरकतो. त्यानंतर पुष्पाची झलक दिसते.

पुष्पा 2 मध्ये पुष्पा आणि भंवर सिंग (फहद फासिल) यांच्यातील संघर्ष सुरूच राहील. रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT