Amala Paul Wedding Esakal
मनोरंजन

Amala Paul Wedding: प्रसिद्ध साउथ अभिनेत्री अमालानं गुपचुप केलं दुसरं लग्न! फोटो व्हायरल

Vaishali Patil

Amala Paul Wedding Photos: साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल तिचा प्रियकर जगत देसाईसोबत विवाह बंधनात अडकली आहे. अमालाच्या वाढदिवशी जगतने तिला प्रपोज केले होते. त्यानंतर लगेचच दोघांनी हयात कोची बोलगट्टी येथे लग्न केले आहे.

कोचीमध्ये या कपलचे लव्हेंडर थीमवर आधारित शाही लग्न पार पडले. अमालाने पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी सर्वांना दिली. आता या जोडप्याच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले आहेत.

अमालाने सोशल मिडियावर शेयर केलेल्या फोटोंमध्ये हे कपल खुपच सुंदर दिसत आहे.मात्र यावेळी अमालानं लाल रंग नव्हे तर लव्हेंडर रंगाची निवड केली होती.

अमालाने तिच्या लग्नात लव्हेंडर लेहेंगा घातला होता आणि केस खुले ठेवले होते आणि वेव्ही लुकमध्ये फुलांनी सजवले होते. त्याचवेळी तर जगतने रंगीत शेरवानी घातली होती.


या नवदामत्याने अतिशय रोमँटिक शैली फोटो शेयर केले आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन त्यांनी आपला लग्न सोहळा साजरा केला.

अमालाचे हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, 'आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रेम आणि कृपेचा उत्सव साजरा करत आहोत... #Married to my divine man... तुमचे प्रेम आणि आशीर्वाद शोधत आहोत.'

सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. दोघांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

अमाला पॉलचे हे दुसरे लग्न आहे. तिने यापूर्वी तमिळ दिग्दर्शक एएल विजयसोबत लग्न केले होते. पण तीन वर्षांनीच दोघांनी घटस्फोट घेतला.

तर अमालाचा पती जगत हा कोण आहे हे तिच्या चाहत्यांना जाणुन घ्यायचे आहे. जगत देसाई हा गुजरातचा आहे. त्याला जिमचा शौक आहे. जगत देसाई हा गोव्यातील एका लक्झरी व्हिलाचा मॅनेजर आहे. दोघेही काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघांनी शाही विवाह केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Maharashtra Latest News Update: राज्यासह देशात आज दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT