Amber Heard says she doesn’t blame jury for ruling in favour of ex-spouse Johnny Depp Google
मनोरंजन

Johnny Depp VS Amber Heard: कोर्टाच्या निर्णयावर अभिनेत्री अम्बर हर्ड नाराज?

जॉनी डेप आणि अबंर हर्ड यांच्यात सुरु असलेल्या मानहानीच्या केसमध्ये कोर्टानं अभिनेत्याच्या बाजूनं निकाल दिला आहे.

प्रणाली मोरे

हॉलीवूड सुपरस्टार जॉनी डेप(Johnny Depp) आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अम्बर हर्ड(Amber Heard) यांच्या मधील मानहानीची केस खूप चर्चेत राहिली. खूप दिवसांपासून सुरू असलेल्या या हाय प्रोफाइल केस दरम्यान एका मागून एक धक्कादायक खुलासे समोर आले. शेवटी खूप ताणलेल्या अन् अनेक दिवस चाललेल्या या केसमध्ये कोर्टातील ज्युरीनं जॉनी डेपच्या बाजूनं निर्णय जाहिर केला. अर्थात ही मानहानीची केस जॉनी डेपनं जिंकली. त्यानंतर जॉनी डेप आपला आनंद सेलिब्रेट करताना दिसतोय तर दुसरीकडे अम्बर हर्ड मात्र या कोर्टाच्या निर्णयानं खूश नाही.(Amber Heard says she doesn’t blame jury for ruling in favour of ex-spouse Johnny Depp)

अम्बर हर्डनं आता या निर्णयावर भाष्य केलं आहे,''मला माहित आहे की जॉनी डेपला खूप पसंत केलं जातं आणि लोकांना वाटतं ते त्याला नीट ओळखतात. तो एक अभिनेता आहे. केस संपल्यानंतर मला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं गेलं. जॉनी डेपवर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप लावल्या संदर्भात मला लोकांनी ट्रोल केलं''.

अम्बर हर्डनं ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की,''कोण माझ्याबद्दल काय विचार करतं यानं मला फरक पडत नाही. कोणी माझ्या घरात माझ्यासोबत काय घडलं, माझं लग्न, बंद दरवाज्यामागचं आमच्यातलं सत्य याबद्दल लोकं काय विचार करतात याला मी महत्त्व देत नाही. कारण मला खरं काय ते माहीत आहे. त्यामुळे ट्रोलिंग मी फार मनावर घेतले नाही. मानहानी केसमध्ये हरल्यानंतर अम्बर हर्डला आता जॉनी डेपला मोठी रक्कम दंड म्हणून द्यायची आहे. जॉनी डेपला देखील अंबर हर्डला नुकसान भरपाई द्यायची आहे पण त्यासमोर अंबर हर्डला लागू झालेली दंडाची रक्कम मोठी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT