Amisha Patel Latest News Amisha Patel Latest News
मनोरंजन

Ameesha Patel : अमिषा पटेल, पाकिस्तानी अभिनेत्याला करतीय डेट? व्हिडिओवरून चर्चा

व्हिडिओनंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली

सकाळ डिजिटल टीम

Amisha Patel Latest News बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल चित्रपट सृष्टीपासून दूरच आहे. एखाद्या चित्रपटात छोट्या भूमिकेत ती दिसते. मात्र, मुख्य भूमिकेत ती चित्रपटात दिसत नाही. अशात अमिषा पटेल (Amisha Patel) पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बासच्या (Imran Abbas) प्रेमात पडल्याची चर्चा रंगली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरूनच प्रेमाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

अमिषा आणि इम्रान दोघेही एकमेकांना पूर्वीपासून ओळखतात. दोघेही अमेरिकेच्या विद्यापीठात एकत्र शिकले होते. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतरही ते एकमेकांच्या संपर्कात होते. इम्रानसोबत प्रेमसंबंध आहेत का असा प्रश्न विचारला असता अमिषाने सांगितले की, माझ्याही कानावर या गोष्टी आल्या. या गोष्टी मूर्खपणाच्या आहे.

अमिषा पटेल (Amisha Patel) आणि इम्रान अब्बास (Imran Abbas) यांची नुकतीच बाहरीनमध्ये भेट झाली होती. कार्यक्रमात दोघे भेटले होते. दोघांनी अमिषा पटेलची भूमिका असलेल्या क्रांती या चित्रपटातील गाण्यावर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. व्हिडिओनंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

अमिषा आणि इम्रानचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामुळे ते नात्यात असल्याची अटकळही जोर धरू लागली. दोघांची केमिस्ट्री लोकांच्या पसंतीस उतरली होती. अमिषा पटेलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सनी देओलसोबत गदर २ मध्ये दिसणार आहे. चाहत्यांना अमिषा पुन्हा एकदा सकिनाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT