Ameesha Patel On The Kerala Story
Ameesha Patel On The Kerala Story Instagram
मनोरंजन

The Kerala Story च्या वादात आता अमिषा पटेलची उडी... धर्मांतराविषयी बोलून गेली मोठी गोष्ट

प्रणाली मोरे

Ameesha Patel On The Kerala Story: अदा शर्मा अभिनित 'द केरळ स्टोरी' सिनेमावरनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुदिप्तो सेन दिग्दर्शित या सिनेमात योगिता बिहानी, सोनाई बलानी आणि सिद्धि इडनानी सारखे इतर कलाकारही आहेत. यामध्ये केरळच्या त्या माहिलांची कहाणी दाखवण्यात आली आहे,ज्यांच ब्रेन वॉश करून धर्मांतर करण्यात आलं आणि दहशतवादी संघटनेत जबरदस्तीनं सामिल करण्यात आलं.

अर्थात सिनेमात करण्यात आलेल्या दाव्यावरनं मोठं तांडव सध्या सुरू आहे. यादरम्यान आता अमिषा पटेलनं आपल्या 'गदर 2' सिनेमाविषयी बोलत धर्मांतराविषयी तिचे विचारही सांगितले.

अमिषा पटेल सध्या तिच्या 'गदर 2' सिनेमाला घेऊन भलतीच उत्सुक आहे. तिनं नुकताच मीडियाशी संवाद साधला आहे. यादरम्यानं तिनं म्हटलं की,'' सिनेमाच्या माध्यमातून खरंतर समाजातील वेगवेगळ्या धर्मांना एकत्रित करण्याचं काम व्हायला हवं. शांती,एकता आणि सद्भावना वाढवण्याचं काम सिनेमानं करायला हवं''.

यानंतर ती म्हणाली की. ''गदर सिनेमात अशी कोणतीच नकारात्मकता किंवा द्वेष दिसणार नाही,हा सिनेमा फक्त प्रेमाचा प्रचार आणि प्रसार करेल''.

Gadar 2

46 वर्षाच्या या अभिनेत्रीनं पुढे म्हटलं की, ''गदर 2 सिनेमा सगळ्या धर्म,जाती आणि पंथाला दाखवते. सिनेमातील एका उदाहरणाचा दाखला देत म्हटलं की गदरमध्ये एक मुसलमान स्त्री आहे जी एका हिंदू पुरुषाशी लग्न करते आणि तरी देखील ती आपल्या धर्माला विसरली नाही. एवढंच नाही तर सनी देओलची जी व्यक्तिरेखा आहे तारा सिंह त्यानं देखील प्रेमासाठी ईस्लाम धर्माचा स्विकार केला आहे''.

सनी देओलचा सिनेमा 'गदर 2' चे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे. या नवीन सिनेमातील कथा ही पहिल्या भागाची कथा जिथे संपते तिथून पुढे सुरू होणार आहे पण ही कथा 2p वर्षानंतरची असणार आहे. 'गदर 2' चा संघर्ष हा साधारणपणे 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या आसपासचा असेल.

जेव्हा 2001 मध्ये गदर रिलीज झाला होता तेव्हा सनी देओल आणि अमिषा पटेलच्या या सिनेमानं बॉक्सऑफिसवर जोरदार कमाई केली होती. या सिनेमानं त्यावेळी अनेक रेकॉर्ड तोडले होते. एवढचं नाही तर आमिर खानच्या ऑस्कर नामांकन मिळालेल्या 'लगान' सिनेमासोबत हा सिनेमा रिलीज झालेला असतानाही 'गदर'ला फार फरक पडला नाही.

सिनेमातील डायलॉग जसं 'हमारा हिंदुस्थान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' हे प्रत्येकाच्या ओठांवर होते. गाण्यांना देखील खूप पसंत केलं गेलं होतं, आता या सीक्वेलमध्ये सनी देओल पुन्हा तारा सिंह आणि अमिषा पुन्हा सकीना बनून लोकांचे मन जिंकायला तयार आहेत. त्यांच्या मुलाची भूमिका उत्कर्ष शर्मा साकारणार आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ ला सिनेमागृहात रिलीज होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

PM Narendra Modi: पत्रकार परिषद का घेत नाही? पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलं

Swati Maliwal: स्वाती मालिवाल प्रकरण तापणार; दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल

'जिरेटोप देणाऱ्याला डोकं नाही अन् घालून घेणाऱ्यालाही डोकं नाही'; उद्धव ठाकरेंचा भर पावसात हल्लाबोल

SRH vs GT : हैदराबाद - गुजरात सामना पाण्यात! काही न करता पॅट कमिन्सचा संघ पोहचला प्ले ऑफमध्ये

SCROLL FOR NEXT