Amitabh Bachachan pays tribute to Shivaji Maharaj on his birth anniversary
Amitabh Bachachan pays tribute to Shivaji Maharaj on his birth anniversary 
मनोरंजन

शिवाजी महाराज जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा : अमिताभ बच्चन

वृत्तसंस्था

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात उत्साह आहे. सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही ट्विट करत महाराजांना अनमोल शब्दांत मानवंदना दिली आहे. बच्चन यांना शिवाजी महाराजांमुळे प्रेरणा मिळते असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले आहे. 

अमिताभ यांनी शिवाजी महाराजांचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, ''छत्रपति शिवाजी महाराज', यह शब्द नहीं, मंत्र है। सदियों बाद भी उनसे प्रेरणा ही मिलती है। वह दुनिया के एक श्रेष्ठ योद्धा और आदर्श राजा थे। उनका स्मरण हमेशा प्रेरणादायी रहा है। छत्रपति शिवाजी महाराज जी जयंती शत् शत् नमन।' अशा शब्दांत त्यांनी महाराजांना वंदन केले आहे. महाराज हा केवळ शब्द नसून तो मंत्र आहे. इतक्या वर्षानंतरही शिवाजी महाराजांमुळे मला प्रेरणा मिळते. ते जगातील सर्वश्रेष्ठ योद्धा होते, अशा भावना अमिताभ यांनी व्यक्त केल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक असे असाधारण व्यक्तिमत्व जे पुन्हा कधीच जन्मास येणार नाही आणि तसे कोणी होणार सुद्धा नाही. छत्रपती शिवाजीराजे हे केवळ राजेच नव्हते तर ते तमाम रयतेचे मायबाप होते, आया बहिणींचे रक्षणकर्ते होते, मराठी मुलुखाचे सर्वतोपरी हित जपणारे होते, शेतकऱ्यांचे बळीराजा होते, सर्व धर्माचे रक्षणकर्ते व आदर करणारे होते, रयतेच्या धनसंपत्तीचे रक्षणकर्ते होते, अन्यायाचे कर्दनकाळ होते, आईच्या शब्दाचे पालन करणारे होते. त्यांच्यात स्वराज्याची जिद्द होती आणि त्यांनी ते स्वबळावर उभारले सुद्धा!  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT