Amitabh Bachchan, Aishwarya Rai-Bachchan Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan Video: 'आराध्यासारखं वागणं बंद कर..', जेव्हा ऐश्वर्यावर मीडियासमोर भडकलेले दिसले अमिताभ

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ऐश्वर्यानं उगाचच आरडाओरडा करत केलेलं कृत्य अमिताभना फारसं रुचलेलं नाही हे स्पष्ट दिसतंय.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan Video: बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंब नेहमीच चर्चेत असलेलं पहायला मिळतं. मग भले स्वतः ते अमिताभ बच्चन असोत की त्यांची नात आराध्या. बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय देखील नेहमी चर्चेत असलेली पहायला मिळते.

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. यादरम्यान आता सासरे आणि सुनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन सूनेच्या म्हणजे ऐश्वर्या राय बच्चनच्या एका हरकतीवर नाराजगी जाहीर करताना दिसत आहेत.(Amitabh Bachchan Angry on aishwarya because of her childish behaviour in front of media viral video)

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा हा एक थ्रो बॅक व्हिडीओ आहे. ज्यामध्ये मीडियासोबत बातचीत करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन निळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत. तर त्यांची सून ऐश्वर्या राय क्रीम कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

या व्हिडीओत अभिनेत्री आनंदानं ओरडत सासरे अमिताभ बच्चन यांना अलिंगन देते. तर आपल्या सूनेची ही हरकत पाहून अमिताभ बोलतात,आराध्यासारखं वागणं बंद कर. अर्थात काही वेळानं अमिताभ स्वतः हसू लागतात.

सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या रायचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना त्यांचा हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. लोक कमेंट्सचा वर्षाव त्या व्हिडीओवर करताना दिसत आहेत. माहितीसाठी सांगतो की ऐश्वर्या रायनं अभिषेक बच्चनसोबत २००७ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर २०११ साली आराध्याचा जन्म झाला होता. आराध्या अनेकदा तिच्या आईसोबत कार्यक्रमातून दिसत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT