Amitabh bachchan Anushka Sharma bike ride without helmet -Update  Google
मनोरंजन

विना हेल्मेट प्रवास केला म्हणून अनुष्काला १०,५०० तर अमिताभना फक्त १००० रु. दंड..असं का? जाणून घ्या यामागचं कारण..

विना हेल्मेट प्रवास करतानाचा अनुष्का आणि अमिताभ यांचा व्हिडीओ समोर आल्यावर लोकांनी मुंबई पोलिसांकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan Anushka Sharma Bike Ride: फिल्म स्टार्स सर्वसामान्य लोकांसाठी रोल मॉडेल असतात. हेच कारण आहे की सेलिब्रिटींच्या प्रत्येक हरकतीवर लोक नजर ठेवून असतात.

काही दिवसांपू्र्वी अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा दोघे हेल्मेट शिवाय बाइकची सवारी करताना दिसले आणि त्यांना पाहून लोक भडकले. थेट लोकांनी मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली.

दोन्ही प्रकरणात मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केल्याचं समोर आलं. पोलिसांनी ट्विटरवरनं या प्रकरणात दंड आकारल्याची माहिती दिली आहे. पण अनुष्का शर्मा प्रकरणात १०,५०० रुपयाचा दंड आकारला गेला आणि अमिताभ बच्चन प्रकरणात फक्त १००० रुपये आकारले गेले.(Amitabh bachchan Anushka Sharma bike ride without helmet mumbai traffiv police fine)

दोन्ही कलाकारांनी हेल्मेट न घालता प्रवास केल्यामुळे त्यांना दंड आकारला गेला होता. पण दंडाच्या रकमेत इतका फरक का होता. तर चला जाणून घेऊया की मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एकाला कमी आणि दुसऱ्याला जास्त दंड का आकारला.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या ट्वीटनुसार अमिताभ बच्चन प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र व्हीकल अॅक्टच्या 129/194(D) सेक्शन अंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणात ५०० ते १००० रुपये दंड आकारला जातो. याव्यतिरिक्त ड्र्रायव्हरचं लायसन देखील तीन महिन्यासाठी रद्द केलं जातं.

अनुष्का शर्मा प्रकरणातही मुंबई ट्राफिक पोलिसांनी कारवाई केली. ट्वीटनुसार अनुष्काच्या प्रकरणात पोलिसांनी महाराष्ट्र व्हीकल अॅक्टच्या 129/194(D), सेक्शन 5/180 आणि सेक्शन 3(1) 181 अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलिसांनी सेक्शन 3(1) 181 अंतर्गत लायसन्सशिवाय गाडी चालवली म्हणून ५ हजाराचा दंड आकारला.. सेक्शन 5/180 अंतर्गत पोलिसांनी गाडीच्या मालकावर लायसन्स नसलेल्या माणसाला गाडी चालवण्याची परवानगी दिल्यामुळे ५ हजार रुपयाचा दंड आकारला आणि 129/194(D) म्हणजे हेल्मेटशिवाय गाडी चालवली म्हणून ५०० रुपयाचा दंड आकारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT