Amitabh Bachchan Birthday, when actor blasted on wife jaya in front of reporters. read detail story. Esakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: १९९२ ची गोष्ट, जेव्हा जया बच्चन यांच्यावर पत्रकारांसमोरच भडकले होते बिग बी

11 ऑक्टोबर 2022 रोजी बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी आपला ८० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.

प्रणाली मोरे

Happy Birthday Amitabh: आपण नेहमीच जया बच्चन यांना पापाराझीवर रागावताना पाहिलं आहे. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला,ज्यामध्ये त्या अभिषेक बच्चन सोबत होत्या आणि अचानक तिथे पापाराझीनं त्यांचे फोटो क्लिक केल्यावर त्या त्यांच्यावर भडकलेल्या दिसल्या. पण अमिताभ बच्चन यांना कधीच कुणी रागावताना असं पाहिलं नसेल कधी,अगदी क्वचित असं घडलं असेल कधीतरी. भले अमिताभ बच्चन यांना सिनेमातील त्यांच्या भूमिकांमुळे अॅंग्री यंग मॅन ही उपाधी मिळाली आहे पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ते खूप शांत आणि सुस्वभावी आहेत. कुठल्याही मुलाखती दरम्यान किंवा कार्यक्रमा दरम्यान ते नेहमीच आनंदी,हसत-खेळत वावरताना दिसतात, अगदी शांत ती मुलाखत किंवा तो शो एन्जॉय करताना ते दिसतात. पण एकदा असं घडलं होतं की त्यावेळी अमिताभ आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत,आणि शेवटी भडका उडालाच. आणि सर्वांसमोर त्यांनी तो राग जया बच्चन यांच्यावर काढला होता.(Amitabh Bachchan Birthday, when actor blasted on wife jaya in front of reporters. read detail story.)

अमिताभ बच्चन यांच्या या रागाचा उल्लेख प्रसिद्ध पत्रकार करण थापर यांनी आपल्या Devil's Advocate:The Untold Story या पुस्तकात केला आहे. पण नेमकं काय कारण होतं अमिताभ यांच्या त्या रागाचं? ती कोणती गोष्ट होती,ज्यामुळे अमिताभ यांचे आपल्या रागावरचे नियंत्रण सुटले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा ११ ऑक्टोबर रोजी ८० वा वाढदिवस आहे,आणि त्यानिमित्तानेच त्यांच्या आयुष्यातील ही महत्त्वाची, फार कमी लोकांना माहीत असलेली गोष्ट इथे शेअर करत आहोत.

Amitabh Bachchan Birthday, when actor blasted on wife jaya in front of reporters. read detail story.

थापर यांनी त्या पुस्तकात अमिताभ बच्चन यांच्या एका मुलाखतीचा उल्लेख केला आहे, जी मुलाखत १९९२ साली अमिताभ यांच्या प्रतिक्षा बंगल्यावरच घेण्यात आली होती. सगळं खुप छान सुरु होतं. मुलाखत चांगली रंगली होती पण तेवढ्यात मुलाखतकाराने अमिताभ यांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या महिला,अफेअर्स याविषयी प्रश्न छेडला आणि वातावरण गढूळ व्हायला सुरुवात झाली. आणि ते इतपत बिघडलं की अमिताभ यांचे आपल्या रागावरचे नियंत्रण सुटले. बराच वेळ त्यांनी तो राग व्यक्त केला नाही, ते शांत राहिले पण एका क्षणी रागानं डोकं वर काढलंच. अमिताभ यांना प्रश्न केला गेला होता की, 'त्यांचे अनेक अभिनेत्रींसोबतचे अफेअर्स चर्चेत राहिले. खूप जणींसोबत त्यांचे नाव जोडले गेले. पण लग्नानंतरही त्यांचे कुणासोबत अफेअर होते का?' तत्क्षणी अमिताभ उत्तरले की,''नाही,कधीच नाही''.

Amitabh Bachchan Birthday, when actor blasted on wife jaya in front of reporters. read detail story.

पण मुलाखतकारानं आणखी तो प्रश्न पुढे खेचत विचारलं,'त्यांचे नाव परविन बॉबी सोबत जोडले जाते. खूप किस्से ऐकायला येतात त्या अफेअरचे'. त्यावेळी अमिताभ फक्त म्हणाले,''नाही. मी पण या अशा कथा ऐकल्या आहेत माझ्याविषयी. पण त्यात काहीच तथ्य नाही. पण मॅगझिन्सना अशा प्रकारच्या कथा लिहिण्यापासून थांबवू तर शकत नाही''. त्यानंतर मुलाखतकारानं जेव्हा, 'रेखासोबत तुमचं अफेअर होतं का?', असा प्रश्न विचारला तेव्हा तर अमिताभनं पूर्ण नकार देत मान हलवली. ते म्हणाले,''रेखासोबत माझं अफेअर कधीच नव्हतं''.

रेखाच्या त्या प्रश्नापर्यंत सगळं ठीक सुरु होतं. अमिताभ शांतपणे अफेअरच्या प्रश्नांवर नाही म्हणून उत्तरं देत होते. पणे जेव्हा अमिताभच्या शेजारी बसलेल्या जया बच्चन यांना अमिताभच्या विवाहबाह्य संबंधांविषयी प्रश्न विचारला गेला तेव्हा सगळं बिघडलं. जया यांना विचारलं की त्यांचा अमिताभवर विश्वास आहे का? तेव्हा त्या म्हणाल्या,''माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे''. पण ते उत्तर देण्याआधी अमिताभ आणि जया बच्चन यांच्यात एक विचित्र शांतता होती काही सेकंदाची जी बरंच काही सांगून गेली. त्यांनतर मुलाखत संपली, पण मुलाखतीतला विवाहबाह्य संबंधांवरचा प्रश्न जेवणाच्या टेबलपर्यंत जाऊन पोहोचला आणि जया बच्चन यांच्या चेहऱ्यावर काहीसे वेगळेच भाव दिसले.

त्याचं झालं असं की मुलाखतीत रेखावरनं विचारलेल्या प्रश्नानं अमिताभ भलतेच नाराज झाले होते. त्यांनी राग व्यक्त केला नव्हता पण तो मनात खदखदत होता. त्यामुळे जेव्हा जया बच्चन जेवणाच्या टेबलवर प्लेट्स लावत होत्या तेव्हा त्यांनी फक्त अमिताभना 'भात घेणार का?' असं विचारलं आणि बस्स इतक्याशा गोष्टीवर अमिताभ खूप वाईट पद्दतीनं गरज नसताना जया बच्चन यांच्यावर भडकले. ते म्हणाले, ''मी कधी भात खात नाही मग आता का देतेयस? बंद कर विचारणं. मला भात नकोय आणि चपाती यायला उशीर असेल तर मी वाट पाहीन,मला घाई नाहीय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला अडचण आहे का काही? मला जे सांगायचंय ते तुला कधी कळत का नाही?''

आणि लंच टेबलवरचं ते नाट्य पाहून कळत होतं की वातावरण तापलंय. कुठली गोष्ट कुठे पोहोचलीय याचा अंदाज पाहणाऱ्यांना येत होता. करण थापर यांनी आपल्या पुस्तकात पुढे लिहिलं आहे,जया बच्चन चपात्या तयार झाल्या का हे पहायला ज्या आत गेल्या,त्या बाहेर आल्याच नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT