Amitabh Bachchan latest post with his tongue out users funny reaction call him naughty amit ji Google
मनोरंजन

Amitabh Bachchan: अमिताभला 'नॉटी' म्हणू लागलेयत लोक, एका फोटोनं उडवली खळबळ

सध्या सोशल मीडियावर अमिताभच्या एका पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन अभिनेता म्हणून ग्रेट आहेत हे वेगळं सांगायची गरज नाहीच,पण त्याहीपेक्षा त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप ग्रेट आहे हे अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या की लक्षात येते. सोशल मीडियावर ते खूपच सक्रिय पहायला मिळतात. अनेकदा त्यांचे मजेदार ट्वीट्स आणि पोस्ट्स चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसतात. नुकतीच अमिताभनी एक पोस्ट शेअर केली आहे,जी पाहिल्यानंतर लोकांनी चक्क त्यांना 'नॉटी' म्हणणं सुरू केलं आहे.(Amitabh Bachchan latest post with his tongue out users funny reaction call him naughty amit ji)

अमिताभ बच्चननी ट्वीटर हॅंडलवर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते चक्क जीभ दाखवत पोझ देताना दिसत आहेत. त्या फोटोला अमिताभनी कॅप्शन दिले आहे ते वाचल्यानंतर मात्र चाहत्यांनी त्यांची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्वीट जोरदार व्हायरल झालं आहे आणि यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चननी ट्वीट केलं आहे की, ''अनेकदा व्यक्त व्हायला(जीभेला) शब्दांची गरज नसते, कितीतरा वेळा शब्दांविना खूप गोष्टी एखादा फोटो(जीभेचा) बोलून जातो''. अमिताभच्या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी अमिताभना ट्रोल करायला तर काहींनी त्यावर मजेदार कमेंट करायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे,'तुमच्यापेक्षा तुमच्या बायकोची जीभ तिखट आहे...बोलायला लागली तर...,तुमच्या जीभेत दम नाही'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'काय नॉटी बोलत आहात सर...', तर आणखी एकानं चक्क 'नॉटी अमित जी' असंच म्हटलं आहे.

अमिताभ सध्या 'कौन बनेगा करोडपती' या शो सोबतच सिनेमाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहेत. पण एवढं बिझी शेड्युल असूनही अमिताभ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढतातच.

अमिताभचे चाहते देखील त्यांच्या पोस्टचा आनंद लुटताना दिसतात. अमिताभ न चुकता ब्लॉगही लिहितात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. अमिताभनी काही दिवसांपूर्वीच आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. पण या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह पाहण्यासारखा आहे.

अमिताभच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर अमिताभ नुकतेच आपल्याला 'गूडबाय' सिनेमात दिसले होते. सध्या त्यांच्याकडे ६ सिनेमे आहेत जे लवकरच रिलीजच्या वाटेवर आहेत. या सिनेमांमध्ये 'उंचाई;,'गणपत','घूमर','द उमे क्रॉमिकल्स', 'बटरफ्लाय' आणि 'प्रोजेक्ट के' यांचा समावेश आहे. यावर्षी अमिताभ बच्चन 'गूडबाय' व्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र','रनवे ३४','झुंड','राधे श्याम' आणि 'चुप- रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' सिनेमात दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव

White Stork in Ratnagiri : महाराष्ट्रात दुर्मीळ असलेला 'युरोपियन पांढरा करकोचा' रत्नागिरीत अवतरला; जाणून घ्या या परदेशी पाहुण्याचा थक्क करणारा प्रवास

कधी राम तर कधी परशुराम! रणबीर कपूरचा अनोखा अवतार पाहून चाहते थक्क; BTS VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : 'पंतप्रधानांकडून दिवाळीनिमित्त ८,००० रुपयांची मदत' देणारे संदेश बनावट; बँकिंग माहिती चोरण्याचा प्रयत्न: गुजरात पोलीस

IND vs PAK Asia Cup Final : भारत-पाकिस्तान, हे आशिया चषक जेतेपदासाठी भिडणार! पण हा सामना केव्हा, कुठे, किती वाजता Live पाहता येणार? कोणतं चॅनेल?

SCROLL FOR NEXT