Amitabh Bachchan on getting corona,kbc shoot stop,New host for few episodes? Google
मनोरंजन

KBC:अमिताभना कोरोना,किती दिवस बंद ठेवणार शूटिंग? काही भागांसाठी मोठा निर्णय...

अमिताभ बच्चन यांनी कोरोनाचा त्रास असहाय्य होत असल्याचं पोस्टमधून म्हटलं होतं. त्यामुळे याचा परिणाम केबीसी शो वर देखील होणार याची चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Kaun Banega Crorepati 14: महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्यासंदर्भात सध्या चिंता करणारी एक बातमी जोरदार पसरली आहे. बिग बी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. आणि त्यानंतर अमिताभनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आजाराविषयी हेल्थ अपडेट दिली. अमिताभनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आपलं प्रकृती स्वास्थ्य आणि कोरोना झाल्यानंतरची अस्वस्थता यावर निराशाजनक भाष्य केलं आहे. बिग बी यांनी चाहत्यांना म्हटलं आहे की,''रोज हेल्थ अपडेट देण्याचा माझा काहीच विचार नाही,कारण सध्या त्या परिस्थितीत मी नाही. पण तरीदेखील मी बरा होईन तेव्हा नक्कीच त्यासंदर्भात हेल्थ अपडेट देईन''.(Amitabh Bachchan on getting corona,kbc shoot stop,New host for few episodes?)

बिग बी यांनी चाहत्यांना सांगितले की, चाहत्यांना डेली हेल्थ अपडेट द्यायचा त्यांचा काही विचार नाही,कारण ते सध्या कोरोनाशी लढा देत आहेत. पण तरीदेखील ते चाहत्यांना आपल्या हेल्थविषयी अपडेट देत राहतील. अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की,''कोरोनापासून संरक्षण व्हावं म्हणून दोन्ही व्हॅक्सिन घेतले,बूस्टर डोस घेतला तरी कोव्हिड जिंकला. ही खरंतर चिंतेची बाब आहे,जी मला माझ्या आसपासच्या जवळच्यांसाठी वाटतेय''.

अमिताभ यांना कोरोना झाल्यामुळे आता त्याचा परिणाम ते होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती १४' च्या शूटिंगवर देखील होणार हे निश्चित. यामुळे आता बिग बी देखील काळजीत आहेत. त्यांनी याविषयी लिहिलं आहे की,''माझ्या कामावर अचानक माझ्या आजाराचा परिणाम झाला आहे, ते त्यांना जितकं मॅनेज करता येत आहे तितकं करत आहेत. हातातून वेळ निघून गेला की गेला,खासकरुन टी.व्ही कार्यक्रमांमध्ये. सगळ्यांनाच माहित आहे यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. सेटअप आणि कॉर्डिनेट करण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि हेच सगळं मला अस्वस्थ करत आहे. आणि यामध्ये जेव्हा लोक आश्वासन देतात की सगळं ठीक होईल तेव्हा थोडा उत्साह वाढतो''. अमिताभ यांच्या मते त्यांच्या हेल्थविषयी अपडेट देणं निरर्थक आहे.

आता या अमिताभच्या पोस्टमुळे चर्चा सुरु झाली आहे की हातात कमी एपिसोड आहेत,आणि अमिताभ यांचे वय पाहता,त्यांना आलेला थकवा पाहता इतक्यात तरी ते सेटवर येणं मुश्किल आहे. तसंच, हा असा शो आहे जिथं लोकांची संख्या प्रेक्षकांमध्ये जास्त असते. अनेकांशी अमिताभ यांचा संपर्क असतो. त्यामुळे डॉक्टर निश्चितच त्यांना परवानगी देणार नाहीत. पण टी.व्ही शो थांबवूनही चालणार नाही. एपिसोड्स तर शूट व्हायला पाहिजेत. मग अशात शो संबंधित काही सूत्रांकडून माहिती कळतेय की शो न थांबवता अमिताभ यांच्या जागी दुसरा होस्ट काही एपिसोडपुरता आणला जाण्याची शक्यता आहे.

आता अमिताभ यांच्या तोडीचा पटकन असं कुणी मिळणं तसं अशक्य आहे. पण काही नावं चर्चेत आहेत,ज्यांच्या भोवती स्टारडम आहे,ग्लॅमर आहे,ज्यांना लोक पाहणं पसंत करतील. अशा नावात शाहरुख खान,अक्षय कुमार, अनुपम खेर, सोनू सूद अशा नावांची चर्चा सुरु आहे. मेकर्सचा यावर विचार सुरु आहे.

आता शाहरुखनं याआधी केबीसीचा सिझन होस्ट केला होता. पण अमिताभ इतकं त्याला होस्ट म्हणून प्रेम मिळालं नव्हतं हे देखील स्पष्ट आहे. तसंच, सध्या तो आणि अक्षय दोघेही शूटमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे काहीच एपिसोड जरी करायचे असले तरी त्यांच्या तारखा आणि वेळेचं गणित कठीण होऊन बसलंय. आता राहिला सोनू सूद. जो सध्या त्याच्या सोशल वर्कमुळे जनमानसात लोकप्रिय आहे. अनुपम खेर यांचे देखील नाव चर्चेत आहे. यावर विचार होतोय,पण अजूनही मेकर्स अमिताभ यांचीच कोरोनातून लवकरात लवकर बरे होण्याची वाट पाहत आहेत. पण काही भागांसाठी अमिताभच्या तोडीचा दूसरा तगडा होस्ट आणण्याचा निर्णय मेकर्स घेतील ही अंतर्गत बातमी देखील समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एलपीजी ग्राहकांना मोठा झटका, सिलिंडरच्या किमतीत वाढ

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

SCROLL FOR NEXT