Amitabh Bachchan Latest News Amitabh Bachchan Latest News
मनोरंजन

Amitabh Bachchan : राजूसाठी अमिताभ बच्चन यांची भावनिक पोस्ट; आता देवालाही...

आणखी एक सहकारी, मित्र आम्हाला सोडून गेला

सकाळ डिजिटल टीम

Amitabh Bachchan Latest News दोन दिवसांपूर्वी कॉमेडिअन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांचे निधन झाले. राजू लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली गेली. मात्र, त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर राजू यांनी अखेरचा श्वास घेतला. निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर बिग बी (Amitabh Bachchan) यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी राजूसाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अमिताभ बच्चन हे केवळ दिग्गज कलाकारच नाही तर अतिशय संवेदनशील व्यक्तीही आहे. राजू श्रीवास्तव उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना अमिताभ यांनी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेला एक संदेश पाठवला होता. आता राजू यांच्या निधनाने दु:खी झालेले अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या ब्लॉगवर राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘आणखी एक सहकारी, मित्र आणि एक सर्जनशील कलाकार आम्हाला सोडून गेला... अचानक आजारी पडला आणि नंतर तो अकाली निघून गेला. रोज सकाळी त्याच्या प्रियजनांकडून माहिती मिळत होती. त्याची प्रकृती सुधारण्यासाठी व्हॉईस मेसेज पाठवण्याचा सल्ला देण्यात आला... मी केला... मात्र तो गेला... त्याची जाणीव नेहमीच सोबत असेल... तो अद्वितीय होता... आता स्वर्गात देवाला हसवत राहील’

रविवारी प्रार्थना सभा

१० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तब्बल ४० दिवस उपचार घेतल्यानंतर बुधवारी राजू यांचा मृत्यू झाला. राजू यांच्यावर गुरुवारी दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी (ता. २५ सप्टेंबर) मुंबईत राजू श्रीवास्तव यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट आणि टीव्ही कलाकारांना श्रद्धांजली वाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारची 'भारत टॅक्सी' सेवा, पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये सुरू; प्रवासी आणि चालकांनाही होणार फायदा

Latest Marathi News Live Update : कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन; माजी मंत्री बच्चू कडू शेतकरी नेत्यांसह आज सरकारसोबत चर्चा करणार?

मोंथाची तीव्रता कमी झाली पण पावसाचा मुक्काम अजून आठवडाभर; कोकणसह विदर्भात 'यलो अलर्ट'

माेठी बातमी! 'भाजपच्या ‘कुटुंबा’त २९ जणांचा ‘घाऊक’ प्रवेश'; साेलापूर जिल्ह्यातील माजी आमदार पाटील, माने यांच्यासह शिंदे, क्षीरसागर यांना पायघड्या

Inspiring journey: 'डॉ. सुधीर पवारांचा सलग धावण्याचा विक्रम'; बारा तासांत १०१ किलोमीटर अंतर पार; सातारा-मेढा-सातारा दोन वेळा फेरी

SCROLL FOR NEXT