Amitabh bachchan google
मनोरंजन

'आता तुमचं वय झालं,थकलेले दिसता'; यावर चाहत्याला अमिताभचं चोख उत्तर

'बिग बी' यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोवरनं रंगलीय चर्चा.

प्रणाली मोरे

अमिताभ वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त सक्रिय असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत बरं का. आताही एकावेळेला त्यांच्याकडे किमान चार ते पाच प्रोजेक्ट्स आहेत,ज्यावर ते काम करत आहेत. तसं अनेकदा ते म्हणूनही दाखवतात की,''मला बसायला आवडत नाही. काम नसेल तर मी अस्वस्थ होतो''. आता निवृत्तीच्या वयात कामाचा असा जोश पाहिला की भल्या-भल्यांना उत्साह आलाच पाहिजे. अर्थात अमिताभ नेहमीच सोशल मीडियावर आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यातल्या अनेक अपडेट्स शेअर करीत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टवर चाहतेही आवर्जुन व्यक्त होतात. तर अमिताभ देखील वेळात वेळ काढून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिसतात.

नुकताच अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यावरनं ट्वीटरवर एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. तो फोटो अमिताभ यांनी फ्लाइटमध्ये काढलेला आहे. याचा अर्थ ते ट्रॅव्हल करीत होते. त्या फोटोवर त्यांच्या एका चाहत्यानं काळजी व्यक्त करीत म्हटलं आहे,''थकलेले दिसत आहात,आराम करा''. तेव्हा अमिताभ यांनी चक्क त्या चाहत्याच्या कमेंटला उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय,''हे केवळ झोप नं मिळाल्यामुळे,तुम्ही मी परिधान केलेल्या जॅकेटवर लिहिलेंलं वाचलं नाही बहुतेक''. याचा अर्थ अमिताभ यांनी चाहत्याला सुचित केलं आहे की मी ट्रॅव्हल करत असल्यानं मला झोप नाही मिळालीय. आणि त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर थकवा आला आहे. मागे एका पोस्टमध्ये अमिताभ यांनी पंधरा मिनिटांची गाढ झोपही आपल्याला कशी रीफ्रेश करते,शरीराला कसं फ्रेश ठेवते यावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. असो,पण वयाची ऐंंशी गाठतानाही अमिताभ यांना 'थकलायत म्हटलेलं आवडलं नाही बहुधा.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' सिनेमात अमिताभ आपल्याला दिसणार आहेत. येत्या ४ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. तर 'बाहुबली' फेम प्रभाससोबतही ते 'प्रोजेक्ट के' या सिनेमात काम करीत आहेत. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT